
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज
*विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून १४.९४ लाख रुपयांचा निधी मंजूर*
तालुक्यातील डोरली येथे आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२३-२४ योजनेअंतर्गत *हनुमान मंदिर परिसरात सभागृह बांधकामाचे भूमिपूजन दिनांक ७ मार्च २०२४ रोजी संपन्न झाले.* _ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांच्या हस्ते कुदळ मारून व श्रीफळ फोडून भूमिपूजन करण्यात आले._
*महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विकासपुरुष विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून डोरली येथे हनुमान मंदिर परिसरात सभागृह बांधकामासाठी १४.९४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.* त्याचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये पार पडला.
यावेळी प्रामुख्याने ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राजेश कांबळे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सहसचिव प्रा. डी. के. मेश्राम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर राऊत, सुरेश पाटील ठिकरे, गिरधर ठाकरे उपसरपंच, विश्वनाथ राऊत, ताराचंद ठाकरे, सोमेश्वर उपासे, हरीजी घुटके, परमेश्वर घुटके, देवदास राऊत, अभय राऊत, नवनाथ भेंडारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमास उपस्थित होते.














