कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि,
चंद्रपूर
*विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते भुमीपुजन*
ब्रम्हपूरी तालुक्यातील काशी म्हणून खरकाडा या गावाची ओळख आहे. या गावालगत असलेल्या वैनगंगा नदीच्या काठावर भगवान शंकराचे मंदिर आहे. या मंदिरात महाशिवरात्री निमित्त मोठी जत्रा भरत असते. या मंदिराच्या परिसरात संरक्षण भिंत व्हावी यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विशेष प्रयत्न करून २० लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर करून दिला आहे. या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते नानाजी तुपट, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते अण्णाजी ठाकरे, उपसरपंच ताराचंद पारधी, मुखरू ठाकरे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमित कन्नाके, माजी सरपंच रविंद्र ढोरे, माजी से.सो.अध्यक्ष योगेश ढोरे, राजेश्वर पारधी, ग्रा.पं.सदस्य प्रफुल ठाकरे, तुकाराम ठाकरे, शांताराम ढोरे, दिलीप ढोरे, किशोर प्रधान, समीर ढोरे, ईश्वर सहारे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, खरकाडा गावातील भगवान शंकराच्या मंदिर परिसराच्या विकासासाठी यापूर्वी देखील आपण विकासनिधी उपलब्ध करून दिला असून पूढल्या काळात देखील मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार आहोत. सोबतच खरकाडा गावापासून आरमोरी-ब्रम्हपुरी या मुख्य महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी देखील निधी मंजूर करण्यात येत आहे. एकंदरीत गावाच्या विकासासाठी आवश्यक निधी टप्याटप्याने आपण देणार असल्याचे देखील यावेळी सांगितले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल मैंद यांनी तर प्रास्ताविक माजी सरपंच रविंद्र ढोरे व उपस्थितांचे आभार तुकाराम ठाकरे यांनी मानले.
*खरकाडा, आवळगाव, जवराबोडी (मेंढा) येथील शिवमंदिरांना दिल्या भेटी*
राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपूरी तालुक्यातील खरकाडा, आवळगाव व जवराबोडी मेंढा येथील भगवान शंकराच्या मंदिरांना भेटी देऊन विधीवत पूजाअर्चा केली. व राज्यातील जनता सुखी, समाधानी राहावी यासाठी भगवान शंकराला साकडं घातलं. सोबतच यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद देखील साधला. यावेळी ते म्हणाले की, असा एक विशिष्ट पक्ष आहे जो फक्त आपणच देवाला मानत असल्याचे लोकांना भासवून जनतेची दिशाभूल करत आहे. मात्र तो पक्ष देव-धर्माच्या नावाखाली जनतेची फसवणूक करीत असल्याचा टोला देखील यावेळी त्यांनी लगावला आहे.

