विद्यार्थी संघटनेच्या मुलांनी केला महिलांचा सन्मान

0
123

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

सिंदेवाही तालुक्यातील आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना ग्राम शाखा रत्नापूर येथील विद्यार्थ्यांनी महिला दिनाचे अवचित्त साधून महिलांचा सन्मान केला.सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता मानिका तसेच
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर महिलांना समाजात असलेली वागणूक आणि त्यांच्यावर होणारा अन्य अत्याचार त्या अन्यायाला बळी पडणाऱ्या महिला आणि त्यांना होणारा त्रास या सर्वांची जाणीव विद्यार्थी संघटनेच्या मुलांना झाली. महिला आहेत तर आपण आहोत आपलं अस्तित्व त्यांच्यामुळे आहे हे जाणून त्यांच्यासाठी एक नाविन्य उपक्रम राबवण्याचे ठरवले व महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विविध खेळाचे आयोजन करण्यात आले. महिला वर्षभर दिवसभर कुटुंबासाठी, समाजासाठी झटत असतात परंतु स्वतःसाठी थोडासुद्धा त्यावेळी देऊ शकत नाही हे जाणून महिलांना कुठेतरी सुखाचा क्षण मिळावा आणि त्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा यासाठी विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी विविध खेळाचे आयोजन केले.
त्यामध्ये पास टू पास , तळ्यात मळ्यात , तीन पायाची शर्यत, गोटा खेळ अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व त्यानंतर बक्षीस वितरण करण्यात आले.

यामध्ये विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अतुल बारेकर, उपाध्यक्ष सानिका दडमल, सचिव भाविक दडमल ,सह कोषाध्यक्ष पल्लवी गायकवाड, संघटक गोपाल गायकवाड, संपर्कप्रमुख अनिकेत वाकडे,सह संपर्कप्रमुख पूजा ढोणे, सांस्कृतिक प्रमुख सचिन ढोणे , सहसांस्कृतिक प्रमुख प्रांजली चौके ,सल्लागार हरीश गायकवाड ,कृपाली दडमल, अंकुश सावसाकडे, वासुदेव दडमल यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here