कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
आदिवासी माना जमात विद्यार्थी संघटना ग्राम शाखा रत्नापुर यांच्या वतीने बाबुराव शेडमाके जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम शहीद बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमांचे या पूजन करण्यात आले. प्रतिमा पूजन विद्यार्थी व संघटनेचे सल्लागार हरीश गायकवाड व अध्यक्ष अतुल बारेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सचिन ढोणे व अतुल बारेकर यांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन अनिकेत वाकडे व आभार प्रदर्शन गोपाल गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष कृष्णा गायकवाड, सचिव भाविक दडमल, अंकुश सावसाकडे सल्लागार ,कृपाली दडमल तसेच विद्यार्थी संघटनेचे संपूर्ण सभासद यांनी परिश्रम घेतले.

