प्रणित तोडे
व्यवस्थापक संपादक
निर्भय बनो सभा गुरुवार दिनांक 14 मार्च 2024 सायंकाळी 5 वाजता न्यु इंग्लीश शाळेचे मैदान चंद्रपूर येथे आयोजित केलेली आहे. या सभेला प्रमुख वक्ते डॉ. विश्वंभर चौधरी (सामाजिक कार्यकर्ते ,विचारवंत व पर्यावरण तज्ज्ञ ) व अँड. असीम सरोदे (कायदे तज्ज्ञ व मानव अधिकार विश्लेषक) मार्गदर्शन करणार आहेत.
या सभेच्या नियोजनाकरिता मुल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजेंद्र वैद्य (प्रदेश सचिव राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट), प्रकाश पाटील (माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर), माजी आमदार देवराव भांडेकर , संदीप गिऱ्हे ( शिवसेना जिल्हा प्रमुख), डॉ. दिलीप चौधरी , शंतनु धोटे (अध्यक्ष जिल्हा युवक काँग्रेस ) व मुल तालुक्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

