कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा या उदांत हेतूने गेल्या अनेक वर्षांपासून मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार यांच्या संकल्पनेतून तालुका काँग्रेस कमिटी सिंदेवाही च्या वतीने तालुक्यातील वासेरा येथे नुकतेच मोफत नेत्ररोग तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सरपंच महेश पाटील बोरकर यांचे हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी सिंदेवाही तालुका काँग्रेसचे कार्यकर्ते परशुराम पाटील बोरकर, गिरीधर नाकाडे, चंद्रशेखर हेमके, नागेश बंडीवार, महेन्द्र सुर्यवंशी, सुरेखा चिमलवार, मायाबाई सलामे, ताराकांत बोरकर, दिनकर बोरकर, प्रशांत सुर्यवंशी, संदीप रामटेके, संजय कापकर, डुबेदास कोवले, लिलाधर कोवले, शशांक रामटेके, शामराव खोब्रागडे, सुनिल सुर्यवंशी, महेन्द्र आत्राम, सुभाष लोणारे, सोमेश्वर बोरकर, विश्वनाथ कोडापे, नाजुक केराम, कुसन आहाके, मारोती कुसाम, केशव कोवले, दुर्योधन रामटेके, ढेकलु कोवे, हरी कुमरे व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तथा वासेरा ग्रामस्थ, व शिबिर लाभार्थी रुग्ण प्रामुख्याने शिबिराच्या उद्घाटन समारंभास उपस्थित होते.
वासेरा येथे आयोजित सदर शिबिरादरम्यान परिसरातील गावातील एकूण ४०३ रुग्णांनी या नेतृत्व शिबिराचा लाभ घेतला. तपासणी अंती सर्व रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तर इतर संभाव्य नेत्ररोगींना नेत्रासंबंधी विकाराचे औषध उपचार मोफत रित्या देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या उदांत हेतूने राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या पुढाकारातून तसेच तालुका काँग्रेस कमिटी सिंदेवाही च्यावतीने विविध आरोग्य शिबिरे आयोजित करून जनसामान्यांपर्यंत याचा लाभ पोहोचविला. अशा विविध शिबिरातून आजवर हजारोंच्या संख्येने नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळाला असून यात नागरिकांच्या विविध शस्त्रक्रिया, कर्करोग निदान व उपचार, नेत्ररोग तपासणी व मोफत चष्मे वाटप, रक्तदान शिबिरे यांचा समावेश आहे.

