प्रणित नामदेव तोडे
व्यवस्थापक संपादक
सरकारच्या माध्यमातून बार्टीला दिला जाणारा अपुरा निधी आणि त्यामुळे बार्टीच्या माध्यमातून दिल्या जाणारे शिष्यवृती,फेलोशिप, स्पर्धा परीक्षा क्लासेस,समतादुतांचे कार्य,स्किल डेव्हलपमेंट यासह इतर सर्व योजना मोडकळीस आल्या आहेत. सम्यकच्या माध्यमातून आज बुधवार दि.१३/०३/२०२४ रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन राज्य प्रवक्ता धिरज तेलंग साहेब , जिल्हा कोषाध्यक्ष तथा पुर्व विदर्भ मिडिया सेल प्रमुख प्रशिक खांडेकर, क्षितीज इंगळे, अमन जुनघरे,नितिश तुरीले पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

