मा. शारदा भुयार (रणरागिणी, वाशिम ) जागतिक महिला दिनानिमित्त वेध फौंडेशन आयोजित रणरागिणी नॅशनल अवॉर्ड सोहळ्यात पुरस्कार

0
79

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

हिंगोली येथे दिनांक 8/3/2024 रोजी वेध फाउंडेशन इंडिया आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त रणरागिणी नॅशनल अवॉर्ड चे वितरण वेध फाउंडेशनच्या अध्यक्षा मा. स्वाती मोराळे यांच्या हस्ते 36 जिल्हातील 36 महिलाचा सत्कार करण्यात आले…!
वाशिम जिल्हातील कारंजा [लाड] मधून शारदा अतुल भुयार ह्या लेखिका कवयित्री असुन विख्यात लेखक गंगाधर पानतावणे सरांचा त्यांच्या विस्तव काव्यसंग्रहाला प्रस्तावना असुन काव्यसंग्रह प्रकाशित आहे. शिवाय राज्यस्तरीय अंकुश काव्यसंग्रह संपादिका आहेत. मुलगी हवीच मला कथा शॉर्ट फिल्म येत आहे. अनेक पुरस्कार मिळाले असुन प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे समाज भूषण पुरस्कार 2022 मिळाला आहे.2023 चा नागपूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नारी रत्न पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्था भारत पुणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवा तांबे यांच्या हस्ते दिल्ली येथे 2023 चा समाज रत्न पुरस्कार मिळाला. रणरागिणी नॅशनल अवॉर्ड, 2024 चा वेध फौडेशन पुणे संस्थेचा पुरस्कार हा वाशिम जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या लेखिका कवयित्री शारदा अतुल भुयार यांना मिळाला.
36 जिल्ह्यातून 36 महिला ची निवड झाली त्या मध्ये शारदा अतुल भुयार यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार वेध फौडेशन तर्फे हिंगोली येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
भव्य दिव्य असा सोहळा आठ मार्च ला जागतिक महिला दिनानिमित्त हिंगोलीत रामलीला मैदान, शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आला अनेक मान्यवर उपस्थित हा सोहळा उत्साहात पार पडला. वेध फाउंडेशनच्या अध्यक्षा मा. स्वाती मोराळे यांच्या हस्ते शारदा अतुल भुयार यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या पुरस्करचे सर्व श्रेय प्रशांत रामटेके यांना देते आहे, आज त्यांच्या मुळे मला पुरस्कार मिळाला आहे त्यामुळे त्यांचे मनापासुन आभार मानते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here