कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
नगरपंचायत सिंदेवाही -लोणवाही येथे दि.१२/०३/२४ ला पूजाताई रामटेके सभापती महिला व बालकल्याण विभाग यांच्या नेतृत्वात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.त्या निमित्याने सफाई कर्मचारी नगरपंचायत सिंदेवाही आणि शहरातील विविध कर्तुत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.यावेळी या कार्यक्रमाला मान. सैनी मॅडम योग शिक्षिका कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहून महिलांना योगा केल्याने काय फायदे होतात ते सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून तनुजा गाडगे , डॉ. वरभे मॅडम, नाहीद शेख मॅडम प्रिंसिपल कल्पतरू विद्या मंदिर सिंदेवाही,सारिका श्रीराम मॅडम संचालक प्राजक्ता कॉन्व्हेंट सिंदेवाही,कार्यक्रमाला नगरसेविका, अंगणवाडी सेविका तसेच गावातील प्रतिष्ठित महिला उपस्थित होत्या.जयश्री नागापुरे (कावळे ) यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.श्वेता मोहुर्ले यांनी आभार मानले.

