अमरावती प्रतिंनिधी
प्रबोधिनी न्युज
महाराष्ट्र शासन यांनी दि १३ मार्च २४ च्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेत पोलीस पाटील यांच्या मानधनात भरीव वाढ करित १५ हजार रु प्रतिमाह मानधन वाढ बाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. याआधी पोलीस पाटील यांना ६५०० रु मानधन मिळत होते. अमरावती जिल्हयातील सर्व पोलीस यांनी मानधन वाढी संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि २० ते २४ नोव्हेंबर २०२३ ला राहुल पाटील सावरकर अध्यक्ष पोलीस पाटील संघ यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे पाच दिवशीय साखळी उपोषण केले होते. यामध्ये जिल्हयातील सर्वच पोलीस पाटील यांनी सहभाग घेतला होता यश मिळाले . राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे व महसुलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलेल्या आश्वासनावर व सर्व पोलीस पाटील यांनी साखळी उपोषण पाच दिवसानंतर सोडले होते. त्याचीच परिपुर्ती म्हणून पोलीस पाटील यांची मागणी पुर्ण करण्यात आली . त्याबद्दल महाराष्ट्र शासन यांचे खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन तसेच आभार.

