prabodhini news logo
Home चंद्रपूर भावा ही तर मुनगंटीवार-वडेट्टीवारांची मॅच फिक्सिंग

भावा ही तर मुनगंटीवार-वडेट्टीवारांची मॅच फिक्सिंग

0
196

राहुल गांधींचा एकाकी लढा; नेते पक्ष विकण्यात व्यस्त

प्रत्येकदा कार्यकर्त्यांनीच मरायचे काय?

एवढेच आहे तर वडेट्टीवारांनी स्वतः लोकसभा लढवावी

प्रणित नामदेव तोडे
व्यवस्थापक संपादक
प्रबोधिनी न्युज

चंद्रपूर – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते असून मोठे नेते आहेत. सुधीर मुनगंटीवार सारख्या तगड्या उमेदवाराच्या विरोधात आपल्या मुलीला तिकीट मागण्यापेक्षा विजय वडेट्टीवार यांनी स्वतः तिकीट मागून मुनगंटीवार यांना तगडे आवाहन निर्माण करण्याची आवश्यकता होती. मात्र वडेट्टीवारांनी तसे न करता आपल्या मुलीचे नाव समोर करून मुनगंटीवार यांना मैदान सोपे करण्यासाठी मॅच फिक्सिंग केल्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.
सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर ही लढाई अटीतटीची असून प्रतिभा धानोरकर यांचे पारडे जड असल्याचे दिसते. प्रतिभा धानोरकर ह्याच काँग्रेसकडे एकमेव उमेदवार आहे ज्या सुधीर मुनगंटीवार यांना कडवे आव्हान उभे करू शकते. प्रतिभा धानोरकर निवडून येण्याची दाट शक्यता असल्याने काँग्रेस पक्षात कोणीही आपल्याला वरचढ होऊ नये ही वडेट्टीवारांची भूमिका दिसते. त्यामुळे वडेट्टीवारांनी मुनगंटीवारांकडून सुपारी तर घेतली नाही ना? हा कार्यकर्त्यांना प्रश्न पडला आहे.
वडेट्टीवार हे काँग्रेसमधील मोठे नेते आहे. त्यांच्यामध्ये खरंच पक्षनिष्ठा असेल तर त्यांनी सुधीर मुनगंटीवार विरुद्ध स्वतः लढावे, नाहीतर प्रतिभा धानोरकर यांना खुले समर्थन द्यावे. मात्र वडेट्टीवारांमध्ये इतकी हिंमत असल्याचे दिसत नाही. कारण त्यांना स्वतःला आपण निवडून येऊ शकत नाही याची गॅरंटी आहे. आणि प्रतिभा धानोरकर हरणार नाही याची सुद्धा गॅरंटी आहे. प्रतिभा धानोरकर यांच्या निवडून येणाऱ्या उमेदवारी विरोधात वडेट्टीवार समर्थकांनी उपद्रव सुरू केला असून वडेट्टीवारांनी काँग्रेस पक्ष संपवण्याची सुपारी घेतल्याचे चिन्ह सध्या चंद्रपूर लोकसभा क्षेत्रामध्ये बघायला मिळत आहे.

जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांची भूमिका राहणार निर्णायक

काँग्रेसचे एकमेव खासदार दिवंगत बाळू धानोरकर निवडून आले त्यावेळी आमदार धोटे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. कित्येक वर्षापासून काँग्रेसच्या ताब्यात नसलेली खासदारकी सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात काँग्रेसकडे आली. यावेळी देखील आमदार सुभाष धोटे जिल्हाध्यक्ष आहे. प्रतिभा धानोरकर यांच्या रूपाने यावेळी सुद्धा खासदारकी काँग्रेसकडे आणण्याची संधी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे आहे. असे झाल्यास सुभाष धोटे यांचे जिल्हाध्यक्ष पद काँग्रेससाठी लकी ठरू शकते.

प्रत्येकदा कार्यकर्त्यांनीच मरायचे काय?
वडेट्टीवार यांचा ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात येत नाही. त्यामुळे चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात त्यांचा मतदारांवर प्रभाव नाही. पक्षश्रेष्ठीकडून याबाबात चाचपणी करणे आवश्यक आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार केल्या जात नाही. नेत्यांच्या स्वार्थाचा विपरीत परिणाम कार्यकर्त्यांना सहन करावा लागतो. कार्यकर्त्यांच्या मनातील उमेदवार म्हणून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असताना तसे होताना दिसत नाही. प्रत्येकदा कार्यकर्त्यांनीच मरायचे काय? असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्ते करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here