ब्रम्हपुरी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिट, शेती पिकांचे मोठे नुकसान

0
31

तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची कॉ.विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची एस. डी.ओ.कडे निवेदना द्वारे मागणी

रविंद्र मैंद
तालुका प्रतिनिधी ब्रम्हपुरी

तालुक्यातील विविध भागांत 19 मार्चला रात्रौ आलेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेत शिवारात अनेक झाडे कोलमडली आहेत. अस्मानी संकटामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडलेला आहे.
परवा मंगळवारला सायंकाळ पासूनच ब्रम्हपुरी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वादळवारा सुरु झाला. रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसासह गारपिट झाली. जवळपास अर्धा तास झालेल्या गारपिटीमुळे विविध भागांतील फळपीक, भाजीपाला पीक आणि रब्बी हंगामातील विविध पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तालुक्यातील बोळधा, कुडेसावली, हळदा, मुडझा, खरकाडा, नीलज, रुई,पाचगाव, गांगलवाडी, बरडकिन्ही, चीचगाव, आवळगाव, मेंडकी, वांद्रा परीसरात अवकाळी पावसासह आलेल्या गारपिटीचा फटका बसला असून तूर, भात,चना, गहू  रब्बी पिकांचे व कारली, टमाटर कांदा वांगा भेंडी, मिरची भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारांमुळे उभे असलेले पीक  जमीनदोस्त झाले आहे. भाजीपाला पिके रब्बी पिके उद्वस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा सर्वे करून आर्थिक मदत करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ब्रम्हपुरी विधान सभा प्रमुख कॉ.विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात बोळदा व कुडेसावली येथील शेतकऱ्यांनी मा. संदीप भस्के उपविभागिय महसूल अधिकारी यांना गुरुवारी निवेदनाद्वारे केली आहे.

मंगळवारला रात्री झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. शेतातील रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिंकांचे व भाजीपाला पिकांना गारपिटीचा जोरदार फटका बसला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी यावी अशी मागणी कॉ.विनोद झोडगे, बोळदा येथील सरपंच मनीषा राजेंद्र झोडगे, राकेश ठाकरे, पत्रकार विजय रामटेके, कैलाश वाडगुरे, अरुण वाडगुरे, विश्वनाथ कोसरे, विनोद वाडगुरे, रवींद्र हुलके, नामदेव कोटगले, गोकुळदास हुलके, बालाजी जुनघरे, रेवणाथ ठाकरे,आनंदराव राऊत,जीवन ठाकरे, कुडेसावली येथील माजी सरपंच वामन दडमल, दौलत ठाकरे, जनार्दन मानकर, संजय ठाकरे, चंद्रशेखर मेश्राम यासह बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here