शहीद भगतसिंग चौक येथे होळीचा सण उत्साहात साजरा

0
104

प्रणित तोडे
व्यवस्थापक संपादक
प्रबोधिनी न्युज

शहीद भगतसिंग चौक येथे होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.वार्डातील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण महालक्ष्मे यांनी वंशपरंपरागत गेल्या ५१ वर्षापासून होळीची विधीवत पूजा करत आले.
भारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचे खास महत्त्व आहे.पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण-बलरामयांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात.या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात.होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते.नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे.

कोकणात होळीचा उत्सव अतिशय मोठा मानला जातो.फाल्गुन महिन्यात येणारा शिमगा उत्सव शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो.शेतीची कामे संपलेली असतात. शेतीची भाजवणी करून ठेवलेली असते. आता पेरणीच्या काळापर्यंत म्हणजे ६-७ जूनपर्यंत (सूर्य रोहिणी नक्षत्रात यायचा दिवस) विश्रांतीचा काळ असतो. त्यामुळे हा काळ कोकणात शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी वापरला जातो.कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे हा सण सुमारे ५ ते १५ दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुण पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो, तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो; याला ‘भद्रेचा होम ‘ असे म्हणतात.फाल्गुन शुक्ल पंचमीला काही ठिकाणी छोटी होळी लावतात आणि नंतर पुढचे काही दिवस गावात पालख्या फिरतात. काही ठिकाणी आधी पालख्या फिरतात आणि पौर्णिमेला प्रत्यक्ष होळी साजरी होते. याला ‘होम’ लागणे असा शब्दप्रयोग वापरतात.काही गावात होम झाल्यानंतरही गावात पालख्या फिरत राहतात अशी प्रथा दिसते.

याप्रसंगी लक्ष्मण महालक्ष्मे,राजु घरोेटे,कार्तिक मुसळे,महेश कोलावार,प्रसाद काटपाताळ,मयुर घरोटे,ओमकार घरोटे,श्रेयश घरोटे,नकुल आचार्य,सागर घरोटे,विवेक घरोटे,विशाल चांदेकर,विनोद अंतुरकर,प्रफुल कामडी, गजानन बडवाईक,तार्केश बुटले,राहुल घरोटे,सतिश चांदेकर,अश्वीन मुसळे,मुकुंदा घरोटे,मुकुंदा घरोटे,ओंकार घरोटे,विवेक घरोटे,रविंद्र घरोटे,पद्मा महालक्ष्मे,वेध महालक्ष्मे,अर्णव घरोटे,साहिल घरोटे,प्रशांत चांदेकर,आस्था घरोटे,श्लोक चांदेकर,कार्तिक भाकरे,नकुल चांदेकर,राजु पांढरे,अमेय सगदेव,साई खेवले,तुषार आत्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here