
सोनाली कोसे
महिला तालुका प्रतिनिधि,
नागभीड़
दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने तसेच गारपीटिमुळे नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार रुपयांची सरसकट आर्थिक मदत शासनाने करावी अशी मागणी चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवा नेते दिवाकर निकुरे यांनी केलेली आहे.
शेतकऱ्यांवर येवढे मोठे संकट असतांना स्थानिक आमदार तसेच लोकप्रतिनिधी आपल्याच कार्यक्रमात व पक्षाच्या कार्यक्रमात मस्त दिसत असल्याचे चित्र दिसत आहे,तसेच विरोधक सुद्धा एकदम सुस्त झालेले दिसत आहेत त्यामुळे “सामान्य जनतेचा वाली कोण..?” असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे.














