
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सिंदेवाही तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पोषण आहाराचे अधिकृत वाटप करण्यात येतात.विद्यार्थ्यांची शाळेची उन्हाळी परीक्षा पुढील एप्रिल महिन्यात सुरू होणार असून शाळेतील पोषण आहाराचे तुटवडा निर्माण झाले आहे. सकाळची शाळा असल्याने शाळेतील विद्यार्थी मधले सुट्टीत घरचा डब्बा आणलेले जेवण करीत आहेत. यामुळे शेतमजूर पालकांची तारांबळ उडाली आहे.
सिंदेवाही तालुक्यातील शालेय विद्यार्थांना पोषण आहाराचे वाटप केले जाते. जिल्हा परिषद शाळेत पोषण आहाराचे नियोजन नुसार पुरवठा केले जाते. सिंदेवाही येथील राम मंदिर जवळील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 मध्ये शालेय पोषण आहाराचे तुटवडा निर्माण झाले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना रोज मिळणारे जेवण शाळेत शिजविले जातात. विद्यार्थ्यांची सकाळी शाळा सुरू झाली असून शाळेची उन्हाळी परीक्षा पुढील एप्रिल महिन्यात सुरू होणार असल्याने विद्यार्थी शालेय पोषण आहार बंद झाल्याने शालेय भोजन पासून वंचित आहेत. जिल्हा परिषद शाळेचे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे मुले आणि मुली पटसंख्या असलेल्या शाळेत पोषण आहार मिळत नसल्याने जेवणासाठी घरचा डब्बा आणले जातात आहे. शाळेतील परिसरात एकत्रित बसून विद्यार्थी जेवणाचा आनंद घेत असताना बिस्कीट आणि फळ खाऊन पोटाची भूक भागवीत आहे.अनेकांचे पालक मजूर, शेतमजूर असल्याने सकाळी उठून मुलांचा जेवणाचा डब्बा बनविताना तारांबळ होत आहे.शालेय पोषण आहाराचा पुरवठा बंद झाल्याने त्रासदायक झाले आहे. प्रशासनाला केव्हा जाग येणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

– शालेय पोषण आहार पुरवठा बंद होणे व महीणाभरापेक्षा जास्त कालावधी होऊनसुद्धा विद्यार्थ्यांना पोषन आहाराचा लाभ न भेटने ही बाब अंत्यंत गंभीर आहे. विद्यार्थी हे गरीब घरचे असल्याने त्यांचे पाल्य शेतकरी, शेतमजुर, कामगार असल्याने सकाळी मुलांची तयारी करून त्यांना टिफीन बनवुन देणे प्रतेक वेळी शक्य होत नसल्याने कधी कधी मुलांना एक फळ किंवा एक बिस्कीट पाकिटने आपली भुक भागवावी लागत असून शासन व प्रशासन सध्या कुंभकर्णाची झोप घेत आहे. – मिथुन मेश्राम अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती सिंदेवाही














