प्रचारार्थ नियोजन तथा आढावा बैठक संपन्न
कांग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्तेनी विजयासाठी कामाला
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
गडचिरोली – चिमूर लोकसभा इंडिया आघाडी समर्पित काँग्रेचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ नियोजन तथा आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सर्व सेल आणि विभागाचे प्रदेश अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली नियोजन बैठक पार पडली.
या वेळी गडचिरोली – चिमूर लोकसभा इंडिया आघाडी समर्पित काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आमदार अविनाश वारजुरकर, माजी आमदार पेंटाराम तलाडी, सेल आघाडीच्या राज्य समन्व्यक प्रज्ञा वाघमारे, माथाडी कामगार सेल प्रदेशाध्यक्ष छगन पाटील, रोजगार सेल प्रदेशाध्यक्ष योगेश पाटील, औद्योगिक सेल अध्यक्ष हेमंत सोनारे, ग्राहक सेल प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग सुरेश यादव, सहकार सेल प्रदेशाध्यक्ष शुभांगी शेरेकर, झोपडपट्टी सेल प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र हंकर, महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष कविता मोहरकर, हसनभाई गिलानी, समशेरखान पठाण सह जिल्ह्यातील सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

