दुसऱ्यादा झाली अध्यक्षपदी अविरोध निवड.
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी डॉ. राजपाल खोब्रागडे यांची पूनच्छ अविरोध निवड करण्यात आली असल्याने समाजात आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे.त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देऊन सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या आणि राष्ट्रीय संवरक्षीका आद. महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद भिमराव यं आंबेडकर साहेब असलेल्या भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा (पूर्व) कार्यकारिणीचे शुक्रवारी मुल येथील पत्रकार भवन येथे पुनर्गठन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष केंद्रीय शाखा तसेच स्टाफ ऑफिसर समता सैनिक दल एस.के.भंडारे, राष्ट्रीय संघटक पद्माकर गणवीर, राज्याचे अध्यक्ष भिकाजी कांबळे, यांचे प्रमुख उपस्थितीत डॉ.राजपाल खोब्रागडे यांना दुसऱ्या दा भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष म्हणून अविरोध निवड करण्यात आली. तर सरचिटणीस म्हणून आद लोमेश खोब्रागडे, कोषाध्यक्ष आद घनश्याम भडके यांची निवड करण्यात आली भारतीय बौद्ध महासभेच्या उद्दिष्टपूर्ती साठी तन मन धनाने काम करण्याचे अभिवचन यावेळी डॉ.राजपाल खोब्रागडे यांनी दिले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्यातील सर्व तालुका प्रतिनिधी, उपस्थित होते. डॉ.खोब्रागडे यांचे निवडीबद्दल वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र कोवले, सिंदेवाही तालुका अध्यक्ष मुखरू बनसोड, सचिव डॉ.शेंडे, प्रा. जगदीश सेमस्कर, धनोज खोब्रागडे, अंबादास कोसे, तथागत कोवले, आक्रोश खोब्रागडे, सुरज खोब्रागडे, शांताबाई पाझारे, शुभांगी खोब्रागडे, सुजाता मेश्राम, वैशाली खोब्रागडे, सोनाली गजभिये, केवळराम साहरे, मनसराम साहरे, व़दना रामटेके, वेणुताई बोदोले, जि एम बांबोळे, यशवंत देवगडे, एन आर कांबळे, अनिल वाकळे, कोमल गेडाम, रमाताई खोब्रागडे यांचेसह जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

