सुविद्या बांबोळे
महिला जिल्हा संपादक
चंद्रपुर
चंद्रपूर – दुर्गापूर -ऊर्जानगर ब्लॅक गोल्ड व पावर सिटीच्या मद्यभागी असलेल्या गौरकार सभागृहात आज दिनांक 31 रोज रविवारला झालेल्या कार्यकर्ता स्नेहमीलन मेळाव्यात महाविकास आघाडी घटक पक्षाचे चंद्रपूर -वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील काँग्रेस प्रणित अधिकृत उमेदवार आ. प्रतिभा धानोरकर यांना विविध पक्ष, संघटनानी जाहीर पाठिंबा दिला.याप्रसंगी, आ. प्रतिभा धानोरकर, आ. सुभाष धोटे, विनोद दत्तात्रय, कामगार नेते के. के. सिंह, राष्ट्रवादी नेते राजेंद्र वैद्य, आदींची उपस्थिती होती.
अनेकांचे जाहीर पाठींब्यासह शुभेच्छा स्वीकारताना भावुक झालेल्या प्रतिभा धानोरकरांनी नाव न घेता विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी दुर्गापूर – ऊर्जा नगर व चिचपल्ली जी. प. क्षेत्रातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वच पक्षातील नेत्यांनी प्रतिभाताई यांना निवडून आणण्याचे कार्यकर्त्याना आव्हान केले.

