कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिंनिधी
चंद्रपुर
सिंदेवाही तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरमाडी येथील वर्ग 5 वी चा विद्यार्थी प्रतिक दिवाकर मुंडरे याची नवोदय विद्यालय परीक्षेत निवड झाली आहे. शाळेच्या वतीने विद्यार्थी आणि त्याच्या पालकाचा सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी मुरमाडी च्या सरपंच सौ. रुपाली रत्नावार, केंद्रप्रमुख नरेश बोरकर, मुख्याध्यापक रमेश मेश्राम, नवोदय परीक्षा मार्गदर्शिका कू सोनाली ज्ञानवल मॅडम, प्रकाश बन्सोड सर, शिक्षणप्रेमी चंदू भेंडारे उपस्थित होते.

