रविंद्र मैंद
तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज,ब्रम्हपुरी
आज दिनांक १ एप्रिल २०२४ सोमवारला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तुलान माल येथे दरवर्षी प्रमाणे इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूनम कसारे (सरपंच ग्रा. पं. तुलानमेंढा) तर प्रमुख अतिथी म्हणून राजकुमार कुत्तरमारे (उपसरपंच), दुर्गा हनवते (ग्रा.पं. सदस्य), वैशाली चौधरी (ग्रा.पं सदस्य), संजय हनवते (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती), राकेश कार (उपाध्यक्ष शा. व्य. स.), रामप्रसाद मडावी (पोलीस पाटील), दुर्गा कार, श्यामलता मडावी, सुनीता हनवते (सदस्या शा.व्य. स.), विजय कुंभारे (मुख्याध्यापक) तसेच विषय शिक्षक जगदीश मेहेर, सहाय्यक शिक्षक टिकाराम बोकडे तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते.
या वेळी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन करताना आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा देत शाळा व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून आपल्या शाळेचे नाव उज्वल करा. असे आवाहन करून शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या करून पाहुणे व सर्व विद्यार्थ्यांसाठी चविष्ट अल्पोपहराची व्यवस्था केली. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सहाय्यक शिक्षक चंद्रशेखर चौधरी, गुलाब बिसेन, विषय शिक्षिका निलिमा यावलकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन यादिती बोरकर व इशांत जिभकाटे याने तर आभार प्रदर्शन प्रणय जगझापे याने केले.
.

