चंद्रपूर जिल्हा नवनियुक्त शिवसेना संपर्क प्रमुख किशोर रॉय यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात घेतली आढावा बैठक..!

0
79

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

चंद्रपुर :- येथील हॉटेल सिद्धार्थ येथे दिनांक 31 मार्च 2024 रोज रविवारला दु. 2:00 वा. चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चंद्रपूर जिल्हा नवनियुक्त शिवसेना संपर्क प्रमुख किशोरजी रॉय यांनी आढावा बैठक घेतली. याप्रसंगी शिवसेनेचे नागपूर विभागीय कार्यालय सचिव प्रफुल मानमोळे, काटोल विधानसभा संघटक रितेश हेलोंडे पाटिल, नवनियुक्त जिल्हा संघटक युवराज धानोरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बंडू हजारे नितीन मत्त्ते, महिला जिल्हाप्रमुख मीनल आत्राम, प्रतिभा ठाकूर, शिवसेना भारतीय कामगार संघटना चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, महानगर प्रमुख भरत गुप्ता व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
यावेळी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीत निवडून आणन्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम ठरविण्यात आला. तसेच शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या कामाला जोमाला लागावे, असे निर्देश जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना संपर्कप्रमुख किशोरजी रॉय यांनी देवून मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांणी सुधीरभाऊंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here