कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर
सिंदेवाही – डॉ. गिरीश गांधी फौंडेशन नागपूर च्या वतीने सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे वडील प्रसिद्ध चित्रकार स्व. दिगंबर मनोहर यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा सन्मानाचा कलासर्जन पुरस्कार सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील प्रसिद्ध नाटय लेखक , दिग्दर्शक , कलावंत , चित्रकार सदानंद बोरकर ,यांना प्रदान करण्यात आला.
25 हजार रुपये रोख,प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप. होते.
सदानंद बोरकर यांना पुरस्कार वेळी उत्तर देताना म्हणाले की,आपल्या ३० वर्षांच्या कलाप्रवासाचे थोडक्यात त्यांनी वर्णन केले. नागपुरातील शिक्षण, रवींद्रनाथ टागोर आणि डॉ. प्रकाश आमटे यांच्यापासून घेतलेली प्रेरणा आणि कलाप्रवास याबद्दल माहिती दिली. ‘कलावंतांचे कुटुंब तयार करायचे, या भावनेतून नवरगावात ३० वर्षांपासून काम करतो आहे. अस्वस्थ वाटायला लागले की नाटक लिहितो आणि आनंद झाला की चित्रे काढतो. इतका प्रदीर्घ काळ सरकारच्या मदतीशिवाय कलाशाळा चालवितो आहे. ग्रामीण भागातील कलावंतांच्या अनेक समस्या आहेत आणि सरकारकडे कितीही वेळा मागणी केली तरी ती सुटत नाही. स्वाभिमानी कलावंत सरकारच्या मागे जास्त काळ धावू शकत नाही’, असे सदानंद बोरकर म्हणाले.हा पुरस्कार सोहळा
दिनांक 7 एप्रिल 2024 ला विष्णु मनोहर, वैशाली किलोर, डॉ.मेजर शिल्पा खरपतकर आणि डॉ. शरद पाटील ,किशोर बुटले,यांच्या उपस्थितीत बाबुराव धनवटे सभागृह , राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर चौक नागपूर येथे सदर पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

