मोदींची वॉरंटी पण काँग्रेसची मात्र हमखास न्यायची गॅरंटी – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

0
104

देशात परिवर्तन करण्यासाठी लढले पाहिजे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गडचिरोली मधील अहेरी विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धडाका

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

देशातील नागरिकांना खोटी स्वप्ने दाखवून भूलथापांच्या राजकारणातून भाजपने सत्ता काबीज केली. गेल्या दहा वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचे वाटोळे करीत व्यापाऱ्यांचे हित जोपासून भाजपाने संपूर्ण देशाला कर्जबाजारी केले आहे. देशातील शेतकरी देशोधडीला लागला असून महिला अत्याचार बेरोजगारी गुन्हेगारी यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. देशात धर्मांधतेच्या राजकारणातून अराजकता पसरविणे युवा पिढी व नागरिकांना दिशाहीन करणे हेच भाजपचे काम आहे

मोदींची वॉरंटी आहे पण काँग्रेसने मात्र न्यायची गॅरंटी दिली आहे.. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव काँग्रेस देणार, तरुणांना रोजगार देणार, आदिवासींना आपल्या जमिनीचा हक्क काँग्रेस मिळवून देईल, अशी भूमिका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली.

देशाची लूट करणाऱ्या सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडी हाच एकमेव पर्याय असून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी व घटक पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ मुलचेरा, अहेरी, एटापल्ली व सिरोंचा येथे प्रचार सभेचा धडाका लावला.

या सभांसाठी प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव कीरसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकड्यालवार, आरपीआय नेते रोहिदास राऊत, शरद पवार गटाचे अतुल गण्यार पवार तथा महाविकास आघाडी व घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, क्षेत्रातील आदिवासी समाज असो किंवा बंगाली समाज असो या प्रत्येक समाजाला समान वागणूक ही काँग्रेसने दिली. आदिवासी समाजाला वन हक्काचे पट्टे देण्याचे काम काँग्रेस काळातच झाले. या परिसराततील सुरजागडला तीनशे हेक्टर जमीन मिळाली तर चेन्ना प्रकल्पाला का नाही..? असे विविध प्रश्न यावेळी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी उपस्थित केले. या लोकसभा क्षेत्राचे भाजपचे गेल्या दहा वर्षापासून खासदार असलेले अशोक नेते ज्यांनी समस्या तर सोडा मतदारांना आजवर तोंड दाखवले नाही. पण आता मात्र जनतेला भेटणारा ,त्यांचा समस्या सोडविणारा खासदार म्हणजे डॉ किरसान तुमच्यासाठी काम करणार, म्हणूनच इंडिया आघाडीच्या उमेदवारांना जिंकून द्या असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here