सुभाष दरेकर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज,अहमदनगर
आज तुळशीदास मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळावात सकाळी दहा वाजल्यापासून अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या प्रथम शेलार यांनीआपला राजकीय जीवनात सविस्तर माहिती दिली त्यांच्या भावना ऐकून काही कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुक लढवायचा आग्रही भूमिका मांडली व अनेक कार्यकर्त्यांनी आघाडी बरोबर राहायचं यांच्या वर ठाम भूमिका मांडली यावर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर घनःश्याम शेलार यांनी काॅग्रेस मध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र राज्याचे काॅग्रेस पक्षाचे नेते ना बाळासाहेब थोरात मेळाव्यात आपल्या पदाधिकाऱ्यांसमवेत उपस्थित झाले व घनःश्याम आण्णा शेलार यांना पक्ष प्रवेश करण्यासाठी आग्रह धरला व शेलार यांनी काॅग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी थोरात साहेब यांनी शेलार यांचे भवितव्य काॅग्रेस पक्षात उज्ज्वल होईल असा विश्वास व्यक्त केला व शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकशाही टिकवण्यासाठी आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी दिपक पाटील भोसले अॅड. काकडे साहेब स्मितलभैया वाबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी निंभोरे सरांनी प्रास्ताविक केले तर संजय आनंदकर यांनी सुत्रसंचलन केले.

