प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
मुंबई – आंबेडकर भवन दादर या ठिकाणी अधिकृत बैठक वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने ठेवण्यात आली व राष्ट्रीय अध्यक्ष अँड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार,आद.सुरेश मोहिते (महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस) व इंजि.प्रो राज आटकोरे सर (महाराष्ट्र प्रवक्ते, पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक) यांच्या प्रमुख उपस्थित आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेले उमेदवार यांना महाराष्ट्रभर निवडून आणण्याकरिता बैठक ठेवण्यात आली, मा.कमलेश उकरंडे (वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष) यांच्या अध्यक्ष खाली बैठक पार पडली. व त्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रत्येक जिल्ह्यातील उमेदवार यांचा प्रचारक म्हणून वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पूर्ण ताकतीने या रिंगणात मेहनत करणार आहोत, तसेच संपूर्ण जिल्ह्यातून आलेले जिल्हा अध्यक्ष यांनी कशाप्रकारे यंत्रणा राबू प्रत्येकाने आपले व्यक्तिगत मत मांडण्यात आले व सुरेश मोहिते व राज आटकोरे सर यांनी प्रचार प्रसार कशा पद्धतीने झाला पाहिजे त्याकरिता संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्षांना पूर्ण माहिती देण्यात आली व कशाप्रकारे प्रचार च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचून व जास्तीत जास्त निधी ॲड.प्रकाश आंबेडकर साहेब यांना देऊ आणि मतदान हे वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना होईल त्याकरिता या फॉर्मुले सांगण्यात आले.
प्रमुख उपस्थिती विनोद नरवाडे ( महाराष्ट्र राज्य प्रमुख सोशल मीडिया व जिल्हाध्यक्ष ईशान्य मुंबई व औरंगाबाद जिल्हा निरीक्षक, सुनील लोखंडे (मुंबई सचिव),मा.कमलेश उकरंडे (वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष), मा.प्रदीप गौतम साळवे (नवी मुंबई, पुणे, जळगाव, जिल्हा निरीक्षक), वेदांत (रायगड जिल्हा निरीक्षक),राज दुरानी (पालघर जिल्हा निरीक्षक), राहुल इंकार (पुणे जिल्हाध्यक्ष), मा.स्वामी ज्योतिर्लिंग (सोलापूर जिल्हा अध्यक्ष), मा.आकाश जावळे (बीड जिल्हाध्यक्ष), के.के जगताप (औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष), सीमाताई कांबळे (नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष), बालाजी पठाडे (जळगाव जिल्हा अध्यक्ष), प्रकाश भाऊ पारेख (जालना जिल्हा अध्यक्ष),बाळासाहेब गायकवाड (बीड जिल्हा महासचिव), मानिक हजारे (बीड जिल्हा उपाध्यक्ष), सिद्धार्थ बनसोडे (अक्कलकोट तालुका अध्यक्ष), ए आर पटेल (कलवा मुंब्रा शहराध्यक्ष),मा.रामा कुव्हारे (सचिव पुणे जिल्हा),मा.सदाशिव कांबळे (प्रसिद्धी प्रमुख पुणे जिल्हा) व कार्यकर्ते आणि सभासद उपस्थित होते.

