सुविद्या बांबोडे
महिला जिल्हा संपादक
प्रबोधिनी न्युज
आज आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे बाबूपेठ ईदगाह मध्ये ईद-उल-फित्र (रमजान ईद) च्या ईद निमीत्त सर्व मुस्लिम बांधवाना फुलांचे बुके देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
ईद-उल-फित्र हा मुस्लिमांचा सर्वात मोठा सण आहे. हा सण रमजान महिन्याच्या शेवटी साजरा केला जातो. रमजान महिन्यात मुस्लिम उपवास करतात आणि अल्लाहची पूजा करतात. ईद-उल-फित्र हा दिवस आनंद आणि उत्सवाचा दिवस आहे.
यावेळी आम आदमी पार्टी चे युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे, अल्पसंख्यांक महानगर अध्यक्ष जावेद सय्यद, जिल्हा युवा संघटनमंत्री अनुप तेलतुबंडे, सह संघटणमंत्री मनीष राऊत, झोन ३ चे सचिव सागर बोबडे, वाहतूक आघाडी अध्यक्ष जयदेव देवगडे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपास्थित होते.
यावेळी बोलताना राजु कुडे म्हणाले, “ईद हा आनंद आणि बंधुभावाचा सण आहे. हा सण आपल्याला एकत्र येण्याची आणि आपल्या प्रियजनांसोबत आनंद साजरा करण्याची संधी देतो.” राजु कुडे यांनी आपल्या भाषणात मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना शांतता आणि समृद्धीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमानंतर, उपस्थित सर्वांनी एकत्र मिळून मिठाई वाटून घेतली आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या.

