अश्विनी कोटमे
महिला जिल्हा प्रतिनिधी,
नाशिक
देवळा येथील जिजामाता कन्या विद्यालयातील इयत्ता 8 वी ची विद्यार्थिनी आनंदी त्र्यंबक देवरे व ऋतुजा नितीन निकम या विद्यार्थिनींची एन. एम. एम .एस शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीसाठी निवड झालेली आहे. सदर विद्यार्थिनींना इयत्ता बारावी पर्यंत दरवर्षी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे त्याबद्दल संस्थेचे चेअरमन हितेंद्र आहेर तथा बापूसाहेब तसेच संस्थेच्या सचिव डॉक्टर सौ मालती ताई आहेर, प्रशासकीय अधिकारी श्री बी के रौंदळ सर आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ प्रतिभा सागर मॅडम, पर्यवेक्षक श्री एस ए पगार सर, सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे परीक्षेत यश मिळाल्याबद्दल सत्कार करून अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

