योग सिद्धीने देवत्व प्राप्त होते- हभप नाना महाराज कदम

0
71

रामायणाचार्य हभप नाना महाराज कदम यांचा डॉ जितीन वंजारे यांच्याकडून सत्कार

बीड प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

बीड- दिनांक २४ एप्रिल रोजी खालापुरी येथे सुमारे दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या आणि सध्या हभप शांतीब्रह्म शिंदे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या अखंड हरीनाम सप्ताह चा सहावा दिवस होता आजची कीर्तन सेवा आमचे मार्गदर्शक, गुरुवर्य रामायणाचार्य कीर्तनकार, बीड भूषण हभप नाना महाराज कदम यांच सुश्राव्य अश्या कीर्तनाने झाली, कीर्तनात योगसिद्धी प्राप्त करून देवाला सहज भेटणायाचा मार्ग महाराजांनी अगदी मोजक्या छान आणी समजेल अश्या भाषेत सांगितला,भक्ती मार्ग उदाहरनासहित सांगून सत्य बोला, हरीनाम घ्या, मित्रत्व जपा,नियतीने वागा असे यावेळी सांगितले. गावात उधारी करणाऱ्या पैसे बुडवणाऱ्या, लबाड,मतलबी लोकांना अंतरंग समजून घेऊन जगायला पाहिजे असे सांगितले,कलियुगात माणसाने माणसाला ओळखले पाहिजे सुरुवातीला माणूस समजून घ्या मगच देवाला भेटण्याचा मार्ग धरा,देवाला भेटण्याचा भक्तिमार्ग इतका सहज सोप्पा नसून त्यातही सहज योग समजून सांगितला,देवाला भेटण्यासाठी संताची गुरूची सांगड लागते प्रत्यक्ष भक्ती मार्ग अवलंबविल्यास स्वतः पांडुरंग भेटायला येतो त्यामुळे भक्तीत तल्लीन व्यायला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी कीर्तन सेवेसाठी आलेल्या महाराजांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केला यावेळी सेवेकरी वारकरी उद्धवनाना काळे महाराज,खालापूरी येथील सरपंच गणेश घोलप, उपसरपंच माऊली परजने, वस्ताद पैलवान दिगंबर गवळी,राजेश उगले,संजय उगले,अजिनाथ परजने,प्रल्हाद परजने, बाप्पासाहेब परजने,पंडित परजने, अशोक गवळीसह अनेक सदस्य,डॉक्टर, शिक्षक, इंजिनिअर, प्राध्यापक, शेतकरी,पोलीस, कर्मचारी सह अनेक ग्रामस्थ,वडिलधारी मंडळी अबाल वृद्ध माता माऊल्या उपस्थित होत्या. खालापूरी गावात सप्ताह निमीत्त दिवसातून तीन वेळा अन्नदान केले जाते ग्राम दैवत हनुमान महाराज यांच्या जयंती निमित्त नगद नारायण गडाच्या गादीला स्मरून खलापुरी येथे गेल्या एकशे त्रेचालीस वर्षांपासून हा अखंड हरिनाम सप्ताह समारंभ होत असतो यावेळी गावातील बाहेर राहणारे लोक एकत्रित येतात सर्व धर्म समभाव जपून गावाला चुलबंद पंगत दिली जाते आणि शेवटच्या दिवशी महाप्रसाद वितरण केले जाते.तरी परिसरातील शेतकरी कष्टकरी बांधवांनी या सप्ताहात होणाऱ्या अन्नदान आणि कीर्तन ज्ञानदान कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा खालापूरी ग्रामस्थ डॉ. जितीन वंजारे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here