जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने भाजपातर्फे मा. ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या कडून ऑटोरिक्षा चालकांचा सत्कार

0
81

चंद्रपूरातील ऑटो रिक्षा चालकांची परिवहन सेवा ही अभिनंदनिय – डॉ. मंगेश गुलवाडे

सुविद्या बांबोडे
महिला जिल्हा संपादक
प्रबोधिनी न्युज

चंद्रपूर – भारतीय जनता पार्टी चंद्रपूरच्या महाराष्ट्र आटोरिक्षा चालक- मालक आघाडी तर्फे जागतिक कामगार दिनाच्या निमित्याने ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या सदस्यांचा सत्काराचा कार्यक्रम महाराष्ट्राचे वने,सांस्कृतिक तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्याचे पालकमंत्री मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा चंद्रपूर जिल्ह्याचे महामंत्री तथा महानगराचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी भूषविले.तसेच भाजपा चंद्रपूर जिल्ह्याचे महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र खांडेकर, चंद्रपूरचे अध्यक्ष मधुकर राऊत, भारतीय जनता पार्टीचे रामकुमार अकापल्लीवार यांची विशेष उपस्थिती होती.
या प्रसंगी डॉक्टर मंगेश गुलवाडे यांनी म्हटले की चंद्रपूर जिल्ह्यातील दळणवळणाची “लाईफ लाईन” हे ऑटो रिक्षा वाहनाच्या माध्यमातून पार पडत असते.चंद्रपूर जिल्ह्यातील सामान्य नागरिकांसाठी ऑटोरिक्षा हे परिवहनाचे माध्यम उपयुक्त, परवडणारे व नेहमी उपलब्ध असणारी दळणवळणाची व्यवस्था आहे. ऑटो रिक्षा चालक मालकांची ही सेवा राष्ट्र उभारणीसाठी समर्पनीय आहे, असे सांगून डॉक्टर गुलवाडे यांनी ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेतील सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.
तसेच सुधीर भाऊंच्या कामाचा दाखला देत, ” सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या अथक परिश्रमातून संघटित झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा चालक-मालक महामंडळाच्या माध्यमातून होणारी मदत पात्र सदस्यांसाठी घरकुल योजना, कोरोना काळाच्या कठीण काळामध्ये सदस्यांना देण्यात येणारी यथायोग्य मदत व सर्व सदस्यांना गणवेश वाटप, चंद्रपूर बस स्थानक जवळ नवीन ऑटो स्थानक” इत्यादी उपयुक्त बाबींचा डॉक्टर गुलवाडे यांनी उल्लेख करून नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आभार मानले.
याप्रसंगी बोलताना ब्रिजभूषण पाझारे यांनी सर्व सदस्यांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या, कार्यक्रमाचे संचालन मधुकर राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील धंदरे यांनी केले.
तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऑटो रिक्षा चालक-मालक असोसिएशनचे संघटक विनोद चन्ने, उपाध्यक्ष जाहीर शेख, महेश ढेकरे कोषाध्यक्ष रवी आंबटकर,किशोर वाटेकर प्रसिद्धी प्रमुख राजू मोहूर्ले, सदस्य गण विलास जुमडे, अरविंद उमरे, रमेश वजे, अंकुश कौरासे,वासुदेव कुबडे, रमेश मून,जनार्दन गुजेकर, सुनील नाकाडे,राजू यादव, आशिष आस्वले, प्रमोद वेरूळकर, राकेश पवार, विजय बारेकर, लक्ष्मीकांत बडगे, मनोज टोकलवार, विलास बावणे, खुशाल साखरकर, इब्राहिम शेख यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here