डी.बी.घाटोळे आणि आर. पी. गोंडाणे यांचा सेवा निवृत्तीपर सत्कार

0
177

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय वासाळा (ठाणेगांव) येथे डी.बी.घाटोळे आणि आर. पी. गोंडाणे यांचा नियत वयोमानानुसार सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव मान. रविंद्र जनवार तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य सुनील मेश्राम,पर्यवेक्षक प्रमोद दिघोरे हे होते.
संस्थेच्या वतीने मा. रविंद्र जनवार यांनी शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानित केले तर विद्यालयाच्या वतीने सुनील मेश्राम प्राचार्य, प्रमोद दीघोरे,सदानंद कुथे,प्रा.नानाजी रामटेके, शेषराव खोब्रागडे, कु.अर्चना उके, कु. खामणकर यांनी घाटोळे आणि गोंडाणे यांचा सपत्नीक ड्रेस, साळीचोळी, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा सत्कारमूर्तीचा परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी केले. मा.रविंद्र जनवार सचिव, गोंडवन विकास संस्था नागभीड यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्या दिल्या. यावेळी भास्कर उरकुडे यांनी आपल्या भाषणातून कृतज्ञता व्यक्त केली व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत मोहीतकर यांनी तर आभारप्रदर्शन प्रमोद दिघोरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here