प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
आज राष्ट्रजन फाउंडेशन परभणी व कुमावत बेलदार समाज सेवा संघ परभणीच्या संयुक्त वतीने महाराष्ट्र राज्याचा महाराष्ट्र दिन म्हणजे महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त हिंदवी स्वराज्याचे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून विविध क्षेत्रातील कामगारांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक बंडू मगर प्रमुखपाहुणे बालकलाकार रुद्राक्ष आवटे पाटील यशवंत उदयवाल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले त्या कार्यक्रमाचे आयोजक कुमावत बेलदार समाज सेवा संघ परभणी जिल्हाध्यक्ष योग गुरु चंपालाल देवतवाल ठाकूर कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्र जन फाउंडेशन परभणी संस्थापक अध्यक्ष गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी प्रास्ताविक प्रत्येक झेंडावंदन साजरी केली पाहिजे 15 ऑगस्ट 26 जानेवारी 17 सप्टेंबर आणि एक मे भारत स्वातंत्र्यापासून ते महाराष्ट्र स्वातंत्र्य पर्यंत सर्वच दिन उत्साहात साजरी केली पाहिजे. पुढच्या पिढीला कळाले पाहिजे ही काळाची गरज आहे म्हणून महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्राचा हा 65 वा वर्धापन दिन महोत्सव उत्सवात साजरा करण्याची संकल्पना करून कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो तर सप्तशृंगी माता मंदिर वसमत रोड शिवशक्ती बिल्डिंग समोर दिनांक एक मे रोजी सकाळी नऊ वाजता पूजन व अभिवादन करण्यात आले तसेच बालकलाकार रुद्राक्ष आवटे यांचा तिसरी वर्गातून मधून उत्तीर्ण झाल्याबद्दल चॉकलेट व पुष्पगुच्छ स्वागत करण्यात आले.

