prabodhini news logo
Home चंद्रपूर गुंजेवाही येथे पार पडला सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा

गुंजेवाही येथे पार पडला सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा

0
858

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही गावात प्रथम सत्यशोधक मुलीचा विवाह सोहळा पार पडला. महात्मा जोतीराव फुले यांनी सांगितलेल्या सत्यधर्माचा प्रसार जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे .
सविस्तर वृत्त असे गुंजेवाही येथील आशाताईं काशिनाथ चौधरी यांची सुकन्या कोमल हिचे मु.पो.भेजगाव ता मुल जी.चंद्रपुर अनुसयाबाई गणपत मोहुर्ले यांचे सुपुत्र राहुल यांचेशी दि ०१ |०५ | २०२४रोज बुधवार ला गुंजेवाही ता.सिदेवाही येथे सत्यशोधक पध्दतीने विवाह सोहळा पार पडला. त्यामध्ये सर्वप्रथम महात्मा फुले,सावित्रीआई फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रवज्लन करुन पाहुण्यांना वधु वराचा व आईवडीलाचा परीचय करुन देण्यात आला, सत्यशोधक विवाहाबद्ल सत्यशोधक विधी कर्ते सुनिल कावळे यांनी थोडक्यात मार्गदर्शन केले. वधूवराच्या हातात हार देवून महात्मा फुले रचित मगलाष्टके म्हणण्यात आले मगलाष्टके नंतर वराडी पाहुण्यांना साक्षी ठेवून वधूवरांना शपथ देण्यात आली,या सत्यशोधक विवाह संस्कार उपस्थीत सत्यशोधक विधीकर्ते सुनिल कावळे , सुभाष शेंडे अध्यक्ष माळी समाज गुंजेवाही हरिचंद्र गुरनुले कोषाध्यक्ष , चंद्रकांत मोहुर्ले ग्रामपंचायत सदस्य गुंजेवाही , गुरू शेंडे सर, किरन बोरुले सर, भगवान दुर्गे याच्या हस्ते सन्मानपत्र सत्यशोधक विधी पुस्तक आणी सुनिल कावळे लिखित क्रातीकारक मायबाप हे पुस्तक देवून सन्मान करण्यात आला. गुंजेवाही गावात व परीसरात ह्या पद्धतीने सत्यशोधक विवाह पहिल्यादा असलेल्या मुळे चर्चेचा विषय ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here