शासकीय वसतिगृहात नेमकं चाललंय तरी काय : आप चे राजू कुडे यांचा सवाल
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर : दिनांक 23 ऑक्टोंबर 2023 ला बाबुपेठ मधिल मूकबधिर शाळेत एका मूक बधिर विद्यार्थीची शारीरिक उत्पीडन करून सदर प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न संस्था चालकांकडून करण्यात आला होता. परंतु सहा महिन्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पिढीत मुलीचा पालकांनी हिम्मत दाखवून केलेल्या तक्रारीमुळे आज आरोपी गजाआड आहे.
ही घटना जिल्ह्याला शर्मसार करणारी असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून असे कित्येक मुलींवर ही घटना घडली आहे याची सखोल चौकशी करावी.
सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी.
रक्षकच भक्षक बनणाऱ्या या शाळेची संस्थेची मान्यता तात्काळ रद्द करावी.
पीडित परिवाराला सुरक्षा देण्यात यावी.
भविष्यात अशी घटना आणखी कुठे घडू नये म्हणून जिल्ह्यातील आदिवासी मुलींचे वस्तीगृह आश्रम शाळा इत्यादी ठिकाणी पथक नेमून चौकशी करण्यात यावी.
इत्यादी मागण्याना घेऊन आज आम आदमी पार्टी तर्फे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, महिला व बाल विकास अधिकारी यांना निवेदनातून मागणी करण्यात आली आहे. यावर तात्काळ कार्यवाही न झाल्यास पिडीत परिवाराला सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा राजू कुडे यांनी दिला आहे.
यावेळेस युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, अनुप तेलतूमडे युवा संघटनमंत्री, तब्बसूम शेख महानगर महिला अध्यक्षा, मनीष राऊत युवा सह संघटनमंत्री, सागर बोबडे झोन सचिव, जावेद सय्यद महानगर अल्पसंख्यांक अध्यक्ष, जयदेव देवगडे वाहतूक अध्यक्ष, इत्यादी उपस्थित होते.

