prabodhini news logo
Home ठळक बातम्या लातूर लोकसभेसाठी बंजारा समाजाचा मोठा निर्णय

लातूर लोकसभेसाठी बंजारा समाजाचा मोठा निर्णय

0
88

काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना पाठिंबा जाहीर

लातुर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

लातूर : दि. २ मे २०२४ लातूर लोकसभेच्या निवडणुकीसाठी डॉ.शिवाजी काळगे यांच्या विजयासाठी लातूर जिल्ह्यातील बंजारा समाजाने कंबर कसली आहे. लोकनेते विलासराव देशमुख, सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख व लातूर ग्रामिणचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सातत्याने बंजारा समाजाला केलेली मदत, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेला पाठपुरावा या गोष्टी ध्यानी घेत लातूर मधील बंजारा समाजातील नेत्यांनी काल समाजाचे धर्मपीठ समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे भेट देत प्रार्थना केली. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान अससेल्या पोहरादेवी कडे डॉ. शिवाजी काळगे यांच्या विजयासाठी साकडे घातले.
लातूर लोकसभेतील समस्त बंजारा समाजाच्या वतीने पोहरादेवी येथे महंत संत श्री रामराव बापूंचे उत्तराधिकारी श्री शेखर महाराज यांची भेट घेऊन काँग्रेसला व डॉ. शिवाजी काळगे यांना पाठिंबा देण्याची विनंती केली. समाजच्या विनंतीला मान देत श्री शेखर महाराज यांनी बंजारा समाजाच्या वतीने लातूर काँग्रेसला पाठिंबा जाहीर करत डॉ. शिवाजी काळगे यांच्या विजयासाठी आशीर्वाद दिले. यावेळी उपस्थित श्री जगदंबा देवीचे पुजारी संत श्री कबीरदास महाराज यांनी डॉ. शिवाजी काळगे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या पोहरादेवी येथील शंकर महाराजांनी पाठिंबा दिल्याने लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
यावेळी बंजारा समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश चव्हाण, भटक्या विमुक्त जाती जमातीचे लातूर काँग्रेस अध्यक्ष राजकुमार राठोड, महिला जिल्हाध्यक्षा उषा राठोड, विजय चव्हाण, विलास आडे, बबलू चव्हाण, प्रकाश राठोड, अनिल राठोड, अशोक चव्हाण, अंकुश राठोड, रमेश राठोड, गुणवंत पवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here