उन्हात लग्नाला जाताना ही काळजी घ्यावी – डॉ जितीन वंजारे

0
140

बीड प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

सध्या उन्हाचा पारा खूप जास्त चढला असल्यामुळे उन्हामध्ये बाहेर पडताना किंवा लग्न समारंभाला जाताना काय काळजी घेतली पाहिजे यावर आज आपण विचार करू.शासनाने उन्हाचा रेड अलर्ट दिल्या गेल्यामुळे उन्हामध्ये बाहेर पडू नये परंतु काही महत्त्वाचं काम,लग्न समारंभ किंवा इतर गोष्टीसाठी बाहेर पडावेच लागते तर आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी करू नयेत यावर प्रकाश टाकूयात. घरातून बाहेर पडताना महत्त्वाचं म्हणजे आपल्यासोबत दुपट्टा, गमजा,हात रुमाल आणि पाय मोजे घातलेले पाहिजेत, पायामध्ये बूट असणे गरजेचे आहे कारण उन्हाच्या झळा या तीव्र असून त्यामुळे पायाला जास्तीचा घाम येऊन डीहायड्रेशन होण्याची दाट शक्यता असते, अंग भरून कपडे घातले पाहिजे,कपडे रंगेबिरंगी न घालता पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे महत्त्वाचे आहे. काळया रंगाची कपडे अजिबात घालू नयेत कारण काळया रंगावरती सूर्यप्रकाशाची किरणे एकत्र येतात त्यामुळे जास्तीचा उकाडा जाणू शकतो,जास्तीचे गरम होऊन चक्कर येऊ शकते. त्याचबरोबर घरातून उन्हामध्ये बाहेर पडताना पाण्याची बॉटल सोबत ठेवणे अत्यंत जरुरीचे आहे, त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये लिंबू शरबत किंवा एनर्जी ड्रिंक सोबत असणं आवश्यक आहे, लिंबामध्ये सर्व इलेक्ट्रोलाइट्स असल्याकारणाने तुम्हाला लिंबू शरबत मुळे एक वेगळी एनर्जी येईल त्याचबरोबर डीहायड्रेशनचा धोका होणार नाही त्याचबरोबर सोबत नारळ पाणी घेणे जरुरीचे आहे.बाहेर चहा किंवा तस्तम पेय,कोल्ड्रिंक घेण्यापेक्षा नारळ पाणी आणि लिंबू पाणी पिलेले केव्हाही चांगले नारळ पाणी,लिंबू पाणी या द्रव्यांमध्ये इलेक्ट्रोलाइट्सचे भरपूर प्रमाण असल्याकारणाने तुम्हाला ड्रीहायड्रेशन होणार नाही. गाडीवर प्रवास करत असताना डोक्याला रुमाल बांधणे किंवा दुपट्टा बांधणे,तो वेळोवेळी ओला करून बांधणे,पूर्ण अंग झाकून घेणे खूप महत्त्वाचे आहे. उघड्या पार्ट वरती अतिनील सूर्य कीरणे पडल्यामुळे त्त्वच्याचा रंग काळपट होईल दुसरी गोष्ट तुमची त्वचा कोरडी होऊन किंवा त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये घाम येऊन त्वचारोग होण्याची दाट शक्यता आहे घामोळ्या,गजकर्ण, नायटा हे होऊ शकत.लग्न समारंभामध्ये गेल्यानंतर हवेशीर जागी बसण्यासाठी जावे खूप जास्त कोंदवाडा,कोंदट वातावरण, खूप जास्त गर्दी किंवा ज्या ठिकाणी व्हेंटिलेशन नाही अशा ठिकाणी गेल्यास एकमेकांचा स्पर्श झाल्यानंतर एकाचे त्वचारोग दुसऱ्यांना जाण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे खाज खुजली गचकरण अशा पद्धतीचे आजार एकाचे दुसऱ्याला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षित अंतर ठेवून लग्न समारंभामध्ये उपस्थित राहावे. लग्न समारंभामध्ये मांडव दिलेला असेल तर चौकोन बंदिस्त करू नये, मोकळी हवा इकडे तिकडे जाईल याची तजवीज करावी,नसता फॅन्स,कुलर किंवा इतर संसाधना वापरणे गरजेचे आहे लग्न समारंभाला जाताना भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. जास्त तेलकट अन्न किंवा जास्तीचे गोड पदार्थ न खाता अगदी हलक अन्न किंवा अर्ध्या पोटी राहिलेले अति उत्तम जास्तीचा उकाडा असल्यामुळे पचनसंस्थेवर त्याचा परिणाम होत आहे त्यामध्ये फ्रीजमधील थंड पाणी पिल्यामुळे आतड्याला सूज येते,पोटामध्ये गॅस तयार होतो,पोट साफ होत नाही,अपचन,करपट ढेकर,अनिद्रा आणि पित्ताचा त्रास झाल्यामुळे चेहऱ्यावर निस्तेजपणा चेहऱ्यावर काळपट येणे डोळ्याखालील भागामध्ये काळी त्वचा होणे किंवा उदासीनता वाटणे या व अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे स्वच्छ भरपूर पाणी प्यावे. लग्न समारंभामध्ये डाळभात आणि सलाड जास्तीत जास्त खावे,त्यामध्ये काकडी गाजर व फळे इत्यादी गोष्टी जास्तीची खावी त्यामुळे पचनास लाभ होईल आणि पाण्याची कमतरता भासणार नाही.लग्न समारंभाला जाताना उन्हामध्ये पायी चालणे, अनवाणी चालणे, मद्यप्राशन करणे, अति तेलकट तिखट तळलेले पदार्थ खाणे इत्यादी गोष्टींमुळे आपल्या आरोग्याला धोका होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला उलटी मळमळ पित्त आणि पोटाचे त्रास होऊन दैनंदिन जीवनामध्ये त्याचा अपव्य होऊ शकतो हे टाळण्यासाठी वरील सांगितल्याप्रमाणे सोपे साधे आणि सरळ नियम वापरावे असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते तथा प्रसिद्ध डॉक्टर डॉ.जितीन वंजारे खालापूरीकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here