रणरागिणी महिला पतसंस्था तसेच महिला बचत गट तर्फे बाबूपेठ येथे पाणपोईची व्यवस्था

0
333

PSI आगलावे यांच्या हस्ते झाले थाटात उदघाटन

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

चंद्रपूर आज दि.5/5 उन्हाळातील मे महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक असते अश्या वेळी नागरिक जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा त्यांना थंड पाण्याची नितांत गरज भासतात,यासाठी दरवर्षी सामाजिक बांधिलकी जोपासणारे बाबूपेठ येथील महिला बचत गट आणि रणरागिणी महिला नागरी सह पतसंस्था यांच्या सौजन्याने नेताजी चौक बाबूपेठ येथे आज दि 5 मे 2024 रोजी पाणपोई चे उदघाटन मा.आगलावे, पोलीस उपनिरीक्षक शहर पोलीस स्टेशन यांचे शुभहस्ते, चंदा वैरागडे संस्थापक अध्यक्ष महिला बचत गट,तसेच रणरागिणी महिला पतसंस्था,सोबतच सुरेखा कुणारपवार वंदना खेळकर तसेच सर्व संचालक मंडळ यांचे प्रमुख उपस्थितीत उदघाटन संपन्न झाले.यावेळी उदघाटक मा.आगलावे यांनी क्रांतिज्याती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले व फीत कापून पाणपोई चे रीतसर उदघाटन केले,यावेळी सौ चंदाताई वैरागडे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून बोलताना आम्ही उन्हाळ्यातील मे महिन्यात कडक उन्ह असते अश्या वेळी रस्ताने ये जा करणाऱ्यां वाटसरूना थंड पाणी मिळावे हा सामाजिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन दरवर्षी महिला बचत गट आणि रणरागिणी महिला पतसंस्थे तर्फे दरवर्षी आम्ही या ठिकाणी पाणपोई ची व्यवस्था करीत असतो,आम्ही केवळ हाच एक उपक्रम राबवित नसून अश्याच प्रकारचे अनेक सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम राबवून समाजात जनजागृती करण्याचे आणि महिलांना सक्षम करण्याचे कार्य महिला बचत गटाच्या माध्यमातून अविरत सुरू आहे,याप्रसंगी PSI आगलावे मॅडम यांनी महिलांच्या पुढाकारातून या ठिकाणी उन्हाळ्यात मानवाला थंड पाण्याची नितांत गरज असते आणि ती व्यवस्था महिला बचत गट आणि महिला पतसंस्थेनी या ठिकाणी करून एक चांगला उपक्रम राबवित आहे.
त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला महिला बचत गट चे सर्व सदस्य,रणरागिणी महिला पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ व परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती,कार्यक्रमाचे संचालन प्रियंका खनके यांनी तर आभार उषा तंगडपल्लीवर यांनी मानले.या कार्यक्रमाला बचतगट मधील महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here