रोशन शेख
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर
चंद्रपुर शहरातल्या महानगर पालिकेतर्फे फुटपाथ वरती पोट भरणा-या गोर गरिब लोकांचे दुकान हटविन्यात येत आहे.जनसामान्य गरिब लोकांनी पोट भरायचं तर कुठे भरायचं.फुटपाथ वरती उदरनिर्वाह करुन पोट भरणा-या लोकांन्कडे ऐवढे पैशे सुद्धा नाही कि ते ४ ते ५ लाख रुपये देऊन एखादी दुकान किरायाने घेऊ शकेल.आमचे सर्व बांधव ऐवढ्या महागाईच्या काळात फुट पाथ वरती रोजी रोटी कमवुन आपल्या कुटुंबाचे पोट कशे तरी भरत आहे ते त्यांनाच माहित.पन फुट पाथ वरती पोट भरणा-या लोकांचे दुकान चंद्रपुर शहरातल्या महानगर पालिकेतर्फे हटविन्यात येत असुन लोकशाहीच्या मतदात्यांकडे चंद्रपुर शहरातल्या एकाही नेत्यांचे लक्षं नाही हा विचार करन्या योग्यं प्रश्न आहे.आमच्या चंद्रपुर शहरातल्या नेत्यांना फक्तं मतदानाच्या वेळी लोकशाहीचा मतदाता आठवतो का.मग ज्यावेळी लोकशाहिच्या मतदात्यांचे फुटपाथ वरती लागणारे दुकाने.हात ठेले महानगरपालिका तर्फे हटविल्या जाते त्या वेळी मात्र आमच्या चंद्रपुर शहरातले नेते गप्पं वं गाढ झोपेत असतात ही सत्य परिस्थिती आहे.चंद्रपुर शहरातल्या महानगर पालिकेच्या हुकुमशाही ला आमचा प्रश्नं असा आहे की जर चंद्रपुर शहरातील महानगर पालिका फुट पाथ वरती पोट भरणा-या गरिब लोकांचे दुकान ठेले हटवित आसतिल तर मग महानगरपालिकाने आधि फुट पाथ वरती पोट भरणा-या गरीब लोकांना १५ ते २० हजार रुपयाने महिन्या प्रमाने रोजगार द्यावे.नंतरच फुट पाथ वरती पोट भरणा-या गरिब लोकांचे दुकान हटवावे.
मग प्रश्न असा पडतो की एवढ्या महागाईच्या काळात फुटपाथ वरती पोट भरणा-या लोकशाहीच्या मतदात्यांनी बघायचे तरी कुणाकडे.फुटपाथ वरती कशे तरी उदरनिर्वाह करणारे पोट भरणा-या जनसामान्य लोकांचा कुणिच वाली नाही.मग जनसामान्य गरिब लोकांनी लोकशाहीच्या मतदात्यांनी नेत्यांना मतदान कशासाठी करायचे.कुणासाठी मतदान करायचे.का बरं मतदान करायचे.हा विचार सध्या फुटपाथ वरती पोट भरणा-या लोकांच्या मणात गोंधळत असुन फुटपाथ वरती पोट भरणा-या प्रत्येक लोकांनी नागरिकांनी लोकशाही आणि लोकतंत्र म्हणजे काय याचा विचार करणे सुद्धा गरजेचे आहे.व तशेच आपल्याच टॅक्स च्या भरोशावरती महानगर पालिकेच्या सर्व अधिका-यांचा व कर्मचाऱ्यांच्या पगार होत असुन आमदार.खासदारांचा पगार सुद्धा जनतेच्याच पैशांनी होतो.तर मग फुट पाथ वरती पोट भरणा-या लोकांच्या पोटावरती महानगरपालिकेची लात का बरं. हा प्रश्नं सुद्धा फुटपाथ वरती पोट भरणा-या लोकांनी समजुन घेणे गरजेचे आहे.जनसामान्यं नागरिकांनी लोकशाहीचा हक्कं बजाऊन सुद्धा लोकतंत्रामध्ये आवाज ऊचलले नाही हुकुमशाही.अन्याय. अत्याचार व आपल्या हक्काच्या प्रश्नां बद्दल बोलले नाही तर लोकशाहीच्या मतदात्याला जगुन काही ही अर्थ राहणार नाही.जो जिवंत असतो तोच आपल्या हक्कांच्या प्रश्नांसाठी लढतो.ज्या लोकांवरती अन्याय अत्याचार होत आहे.त्या सर्वांनी आपले हक्कं घ्यायसाठी लोकतंत्रा मध्ये आवाज उचलायला पाहिजे लढायला पाहिजे.कारण मुर्दे कधी आपले हक्कं मागत नाही.जे जिवंत असतात ज्यांची अंतरात्मा जिवंत असतो तोच व्यक्ती अन्याय अत्याचार च्या विरोधात आवाज ऊचलतांना दिसतो.
तर चला मग वाट कशाची बघता
ऊषककाळ होता होता काळरात्र झाली.अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली.
मी माझ्या सर्व बांधवांसाठी त्यांच्या हक्कांच्या प्रश्नांसाठी लढणार.बोलणार आणि लिहणार सुद्धा.पण आमचे मत वं विचार एवढेच आहे की आमच्या सर्व बांधवांनी एकजुट होऊन हुकुमशाही विरोधात लढा दिला पाहीजे.
मानवधर्म एकता मंच मित्रपरिवार चंद्रपुर

