prabodhini news logo
Home चंद्रपूर तेंदूपत्ता मजुरांना अल्पपोहाराने दिला दिलासा

तेंदूपत्ता मजुरांना अल्पपोहाराने दिला दिलासा

0
322

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

चंद्रपूर- दि10 मे सध्या उन्हयाचे दिवस सुरू असून तीव्र ऊनतापत आहे, व त्यातच तेंदूपत्ता सिजन सुरू असल्याने वन मजूर रखरखत्या उन्हात जनगलात फिरून तेंदू पत्ता गोळा करीत आहे,त्यामुळे ते भुकेने व तहानेने अत्यन्त व्याकुळ होत असतात,याची जाण स्थानिक नेताजी उत्सव समिती बाबूपेठ च्या सदस्यांनी घेतली.

आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर समितीचे सदस्य व आयोजक विवेक पोतनूरवार, रवींद्र वनसिंगे वश्री विजय राव देशमुख यांनी सकाळी 9 वाजता अल्पपोहार,शीत पेय, थंड पाणी जुनोना येथे नेऊन वन मजुरांना देऊन त्यांची तृप्ती केली, या अल्प पोहराने त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद झळकत होता तो खरच पहाण्या सारखा होता, गरजू व्यक्ती पर्येंत आम्ही पोहोचून त्यांना अल्प प्रमाणात का होईना दिलासा दिला याचा आम्हाला आनंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here