जळगांव प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज नेटवर्क
जामनेर तालुक्यातील खडकी या गावी डॉ. ऐश्वर्री राठोड या गेल्या असत्या, ग्रामस्थांनी मांडल्या व्यथा, आठ दिवसातून पाणी येते. पाण्यासाठी महिलांना मुलांना सर्वांना वन वन भटकावे लागते. पाण्याची पाईपलाईन ही गंगापुरी धरणातून झालेली आहे .पाण्याची टाकी सुद्धा झालेली आहे .परंतु तरीसुद्धा ठेकेदाराने 45 लाख आल्यानंतर सुद्धा कामगिरीही योग्य प्रकारे निभवली नाही .हे जनतेने स्वतःच्या तोंडाने डॉ. ऐश्वरी राठोड पुढे बोलले. खडकी हे गाव डॉ.ऐश्वरी राठोड यांचा आहे आणि जर माझ्या गावाच्या लोकांना पाण्यासाठी महिलांना मुलांना वन वन भटकावं लागत असेल .तर यापेक्षा मोठा दुर्दैव कायच असणार गोरगरिबांच्या योजनेमार्फत येणारा पैसा आपण कसं काय या गोष्टीला नाकारू शकतो की तो पैसा गोरगरिबांसाठी वापरल्या जात नाही आणि मध्येच हे कारण आम्ही सुरू असतात हा प्रश्न मोठा आहे .या प्रश्नांमध्ये सर्व जबाबदार आहेत. मागील सरपंच सुद्धा, सध्याच्या सरपंच यानी जाणीव ठेवली पाहिजे ,की जनता ही उपाशी तपाशी फिरत आहे. जिल्हा परिषद सदस्य या कधीही येऊन या गावांमध्ये बघितलं नाही जनता स्वतः त्यांच्या तोंडाने बोलत आहे. जामनेर तालुका हा मंत्र्यांचा आहे. गाव सुद्धा त्यांचा आहे. जनता आपली असते, आपल्या जनतेसाठी आपण सतत सहकार्याला उभा राहिला पाहिजे आणि जेव्हा आपल्या गावची जनता पाण्यासाठी, आपल्या महिला भगिनी मुलं वन वन भटकत असतील ,तर यापेक्षा मोठे दुर्दैव काय?? सरकार आपली आहे. एका गावामध्येच हा पाण्याचा प्रश्न असेल असं नाही असे तर कित्येक गाव असतील. परंतु सगळ्या गोष्टीची विचारपूस केल्या गेली पाहिजे. निदान अन्न वस्त्र निवारापासून जनतेला वंचित ठेवणे हे मोठे दुर्दैव आहे आणि दुष्कर्म आहे. अशा गोष्टी यापुढे तालुक्यामध्ये व्हायला नको. तालुका हा सुजलाम सुफलाम प्रत्येक गोष्टीमध्ये झाला पाहिजे. कारण की जनता ही शेवटी जनार्दन असते असं डॉ. ऐश्वर्री राठोड बोलल्या.

