प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर दि 12 नेताजी उत्सव समिती नेताजी चौक बाबूपेठ दर महिन्यात गोर-गरिबांना दिलासा देण्याकरिता नवनवीन उपक्रम राबवित असते,काल परवाच जुनोना येथील तेंदूपत्ता कामगारांना अल्प पोहार, शीत पेय व थंड पाणी देऊन दिलासा देण्यात आला.
त्याचाच एक भाग म्हणून आज लोहारा येथे विटा भट्टीवर काम करणाऱ्या मजुरांना कपड्याची नितांत आवश्यकता असल्याचे आयोजक विवेक पोतनूरवार याना कळले,लगेच त्यांनी आपल्या मित्र परिवाराशी संपर्क साधून जुने कपडे गोळा केले, आज दि 12 मे रोजी विवेक पोतनूरवार,चैतन्य पोतनूरवार, अनिल व अश्विनी तुंगीडवार, रवींद्र वनसिंगे यांनी लोहारा गावी जाऊन मजुरांना कपडे वाटप केले, कपडे वितरणाचे या कामात कपडे पुरविण्यास अनिल व अश्विनी तुंगीडवार, रवींद्र व जयश्री वनसिंगे, दिनेश व सौ तेजस्वी पोडे, झामदेव दीपाली व रुपाली धामणगे, माधुरी केशटटीवार, मार्तिवार यांनी अथक सहकार्य केले, सामाजिक बांधिलकी जोपासून कार्य करण्यात हे व्यक्ती सदैव अग्रेसर असतात, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार समितीने मानले आहे,आता नुकत्याच जून महिन्यात शाळा सुरू होत असून दरवर्षी 5 गरीब घराण्यातील मुला, मुलींना पुस्तके,ड्रेस, शुज व टिफिन स्वतः विवेक पोतनूरवार यांचे मार्फत देऊन शैक्षणिक कार्यास हातभार लावण्यात येत असते.

