प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
बीड – महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने व मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार बीड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती यामध्ये बीड शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पंधरा ठिकाणी सभेचे आयोजन केले होते व वेगवेगळ्या ठिकाणी पदयात्रा, रॅली, इत्यादीच्या प्रचाराच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला व चिन्हाला सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने करण्यात आलेले आहे. सदरील निवडणूक ही जातीवादी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी असून जातीवादी धर्मांध शक्तीपासून भारताचे संविधान वाचवण्यासाठी व भारताच्या सामाजिक एकोपा अखंडित व आबादीत राहण्यासाठी महाविकास आघाडीच्या बजरंग बप्पा सोनवणे यांना विजयी करणे हे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे बीड शहरातील मतदारांनी कोणत्याही अफवा भूल थापा ना बळी न पडता मतदान चिट्ठी आली नाही रिक्षा आला नाही ऊन वारा जास्त आहे अशा कारणांनी घरी न थांबता स्वतःची जिम्मेदारी समजून स्वयस्फूर्तीने आपले व आपल्या घरातील सर्व मतदारांचे मतदान महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना करावे व मोठ्या मताधिक्याने भारताच्या संसदेत पाठवावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बीड शहर प्रमुख शेख निजाम यांनी केले आहे.

