कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
सिन्देवाही तालुक्यातील वासेरा ते जामसाळा दरम्यान मामा तलावाच्या सांडव्याच्या पुलाजवळ सायकल व दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. हा अपघात काल सायंकाळी ०७:३० वाजता घडला. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. विठ्ठल लक्ष्मण चौधरी वय २४ रा. कन्हाळगाव ता चिमुर असे नाव आहे. सुमित दत्तु दांडेकर वय २२ रा. मोहाळी हा दुचाकी चालवत होता. सायकलस्वार नितेश प्रभाकर श्रीरामे वय २९ हा जामसाळा जुना येथील रहिवासी असुन प्राथमिक आरोग्य केंद्र वासेरा येथे डब्बा नेवुन देण्यासाठी गेला होता. परतीच्या वेळेस त्याच दिशेने येणार्या दुचाकी पॅशन प्रो एम.एच ३४ बी यु ६१९२ ने धडक दिली. यात नितेश सुध्दा जखमी झाला. दुचाकीस्वार यांना गंभीर मार लागल्यामुळे ग्रामीण रुग्णालय सिन्देवाही येथे भरती करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्देवाही पोलिस करीत आहेत.

