विठ्ठल पाटील हंडरगुळी
गत चार दिवसापासुन गायब झालेला अवकाळी पाऊस आज दु.२-४५ वा. दरम्यान मेघगर्जनेसह अचानक सुरु झाल्याने चार दिवसापासुनची गरमी कांही अंशी कमी झाली आहे. गत कांही दिवसापासुन अधुन-मधून या भागात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडत असल्याने जनजिवन विस्कळीत झाले असुन,आले निर्सग राजाच्या मना तेथे कुणाचे चालेना. ही म्हन सार्थ ठरताना दिसत आहे.तर पाऊस येण्याची लक्षणे दिसताच एमएसईबी सेंटर हाळी येथून वीज पुरवठा बंद करतात.ती आज ही बंद केली होती.यामुळे वीज बंद करायची तत्परता दाखविणारे आणी आकडे बहाद्दरांना आर्शिवाद देणारे जे.ई. महाशय वीज पुरवठा अखंडीतपणे व योग्यदाबात सुरु होण्यासाठी तत्परता का दाखवित नाही.असा सुर पाटील { जुनी बाजार } गल्लीत निघत होता. एकंदरीत अवकाळी पावसाने आणि विजेच्या लपंडावाने अख्खा ऊन्हाळा भर कहर केला असुन,आगामी पावसाळ्यात पावसासह विजेचा ही पुरवठा कसा असेल.हे एक कोडे या भागातील जनतेला सतावत आहे.
पावसाचे कुणाच्याच हाती नसते पण विजेचे ज्यांच्या हाती आहे.ते जे.ई. व लाईमन मंडळी विज पुरवठा सुरळीत व्हावा,यासाठी मेहनत का घेत नाहीत आणि अवकाळी पावसाची कमी पण राञंदिवस हकनाक वीज बंद ठेवत असलेल्या जे.ई.च्या कारनाम्यासह सध्या निर्सगाला आली लहर आणि हाळीच्या जे.ई.ने विज पुरवठा खंडीत करण्याचा केला कहर.अशी चर्चा हाळी व परिसरात ऐकू येते.

