विरोधी पक्षनेते मा.ना.विजय वडेट्टीवार यांच्यातर्फे करोली येथे आर्थिक मदत

0
77

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

सावली तालुक्यातील मौजा. करोली येथे मृत कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या कुटुंबियाना राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.विजय वडेट्टीवार यांच्या तर्फे सावली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा.नितीन गोहने तसेच प्रसिद्ध नाट्य कलावंत मा.डॉ.राज मराठे यांच्या वतीने सदर मदत देण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की,मौजा.करोली येथील तरुण स्व.प्रमोद बोटकवार वय ३२ वर्षे हे काही दिवसापूर्वी कैंसरमुळे उपचारा दरम्यान मृत पावले,त्यांचा पश्चात फक्त त्यांची पत्नी श्रीमती प्रतिभा प्रमोद बोटकावार व लहान मुले असल्याने व उदर्निवाहासाठी दुसरे कोणतेही व्यवसाय अथवा शेती नसल्याने आर्थिक मदत देण्यात आली, स्व.प्रमोद बोटकावार हे अतिशय गरीब कुटुंबातील असून भूमिहीन शेतमजूर कुटुंब प्रमुख होते, मिडेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते, पण काळाने त्यांचावर घात केला,कुटुंबावर आर्थिक संकट आल्याने त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना मिळताच राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून सदर मदत मिळवून दिली.

आर्थिक मदत देताना तृप्ती पवार,मा.प्रवीण बोटकावार,मा.अनिल बोटकावार,मा.भोजराज गेडाम,मा.यशवंत खोब्रागडे,मा.शरद लोहंबरे,मा.अशोक खोब्रागडे,मा.देऊजी मोहुर्ले,मा.प्रदीप वाढणकर, मा.लक्ष्मण अलबनकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here