ब्रम्हपूरी येथे स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांची जयंती साजरी

0
224

कवी अनंत राऊत यांच्या कवितांनी ब्रम्हपुरीकर झाले बेधूंद

रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज

ब्रम्हपूरी येथील शिवछत्रपती फाउंडेशनच्या वतीने स्वराज्यक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहिलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी, प्रेरणादायी वक्ता, गझलकार अनंत राऊत यांच्या मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा अशा विविधांगी बहारदार लोकप्रिय कवितांनी ब्रम्हपुरीकरांना बेधूंद करीत मने जिंकली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती विलास विखार यांच्या हस्ते पार पडले. तर अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देवेश कांबळे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून ओबीसी विचारवंत भाऊराव राऊत, रयत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.राकेश तलमले, चौगान येथील उपसरपंच प्रा. अंकुश मातेरे, सामाजिक कार्यकर्ता बाळु गडे, चंदन नगराळे, कवी गौतम राऊत, महीला काँग्रेसच्या शहर कार्याध्यक्ष सुधाताई राऊत यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना कवी अनंत राऊत म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अनेक बखरकार व लेखकांनी लिहितांना त्यांचे चारित्र्यहनन केले आहे. संभाजी महाराजांचा चुकीचा इतिहास लोकांपुढे आणला आहे.
संभाजी महाराजांनी आपल्या हयातीत अनेक ग्रंथ रचले. मराठी आणि संस्कृतमध्ये लिहिलेले बुधभूषणम हे सर्वात उल्लेखनीय आहे. आणि तीन इतर पुस्तके, नायिकाभेद , सातसतक , नखशिखा ही हिंदुस्थानी भाषेत लिहिलेली आहेत . बुधभूषणममध्ये संभाजी महाराजांनी राजकारणावर कविता लिहिली. पुस्तकात संभाजी महाराज काय करावे आणि करू नये याबद्दल लिहितात आणि लष्करी डावपेचांची चर्चा करतात. याशिवाय त्यांना अनेक भाषांचे ज्ञान होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी एकही लढाई हरली नव्हती हे उल्लेखनीय आहे असेही यावेळी ते म्हणाले.
तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देवेश कांबळे हे बोलतांना म्हणाले की, महापुरुषांची जयंती साजरी करणे काळाची गरज आहे. त्यामुळे असेच समाजपयोगी कार्यक्रम घेणे गरजेचे आहे.

यावेळी कवी अनंत राऊत यांनी स्वलिखीत अनेक कवितांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ब्रम्हपुरीकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवछत्रपती फाउंडेशनचे अध्यक्ष जगदीश उर्फ मोंटु पिलारे यांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here