प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
वियानी पब्लिक स्कुल, बाबुपेठ चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांनी यशाची उज्वल परंपरा कायम राखत नेहमी प्रमाणेच नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र माध्यमिक बोर्डाच्या (SSC) मार्च 2024 परीक्षेत घवघवीत यश मिळवून 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतून एकूण 11 विद्यार्थी या परिक्षेत बसले होते, त्यापैकी 2 विद्यार्थीनी 90% वर गुण संपादन केलेले आहेत. त्यात कुमारी महेक प्रभाकर बोढाले या विदयार्थीनीने 91.80% गुण संपादन करून शाळेतून पहिला येण्याचा मान मिळविला आहे. तसेच कुमारी प्रकृती अशुल भसारकर 90.60% कुमार वेदांत अरविंद गेडाम 86.20% या विद्यार्थीनी गुण संपादन केले आहे.
शाळेचे माननीय मुख्याध्यापक फा. फान्सिस मिंज व उपमुख्याध्यापिका मदर राणी व सर्व शिक्षकवृदांनी सर्व विदयाथ्य विद्यार्थीचे अभिनदंन करुन त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.

