लोकमान्य टिळक विद्यालयातील विद्यार्थ्याचे सुयश..
प्रणित तोडे
शहर प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर : माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच १० वी चा निकाल हि विद्यार्थ्यांच्या जीवनातील पहिली परीक्षा असून या नंतर विद्यार्थ्यांनी भविष्यात आपल्याला कोणते ध्येय गाठायचे आहे हे निश्चित करावे. भावी जग हे स्पर्धेचे असून विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. रवींद्र भागवत यांनी केले.
ते नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या दहावी च्या निकालात येथील लोकमान्य टिळक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले अशा विद्यार्थ्यांना संबोधित करीत होते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या व्यवस्थापन व शाळा प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
यावेळी लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे सचिव गांगेय सराफ, उपमुख्याध्यापक प्रफुल्ल राजपुरोहित, प्रामुख्याने उपस्थित होते. शाळेचा निकाल ९०.५५ % असून शाळेची विद्यार्थिनी कु. कुमुशी रामटेके हिने दहावीच्या निकालात ९२.४० % गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा मान प्राप्त केला आहे. या व्यतिरिक्त संकेत बेले ८८.२० %, तेजस दुर्सेलवार ८६.८०%, वैष्णवी बोबटे ८६.२० %, सुबोध पुंड ८५.६० %, अनुष्का नरुले ८२.८० %, प्रणय डोणेकर ८२.२० % या विद्यार्थ्यांनीही सुयश प्राप्त केले आहे.
यावेळी पर्यवेक्षक सचिन जहागीरदार, योगिनी देगमवार, शुभांगी खाडीलकर, शरयू श्रीगडीवार, प्रदीप तेलंग, कार्तिक चरडे, किशोर काहारे, प्रभू शहारे, तुळशीराम चाचरकर व सर शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

