रोशन शेख
चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्ष भरापासून रेती घाटाचे लिलाव झाले नाही.व तशेच रेती न मिळत असल्यामुळे नागरिकांचे मंजूर झालेले घरकुलाचे बांधकाम थांबुन आहे.थांबलेल्या घरकुलांचे काम लवकरात लवकर पुर्ण व्हावे या करिता निदान शासनाने पुढाकार घेत घरकुल लाभार्थ्यांना लवकरात लवकर रेती उपलब्ध करून द्यावी.काही नियम काही कारण व अटी मुळे जिल्ह्यात वाळू घाटाचे प्रश्न अडकले आहे.काहीशा वाळू घाटाचे लिलाव झाले असुन त्याबाबत टेंडर सुद्धा झाले मात्र अजुनही सदर निविदा उघडण्यात आली नाही.व रेती न मिळत असल्यामुळे शासकिय योजनेमधिल घरकुलांचे काम पूर्णत बंद करण्यात आले आहे.शासन प्रशासनाने घरकुल ची परवानगी दिली असुन लहान सहान शा झोपड पट्टि धारकांनी आप आपली झोपडी घर तोडुन आशेनी घरकुलांचे घर बांधन्यास सुरुवात केली बांधकाम सुद्धा सुरू झाले.मात्र वाळू बंद झाल्याने घराच्या कामातील अडथळा आला वं गोर गरिब कुटुंबातील लाभार्थी नागरिकांचे घरकुल घर बांधन्याचे स्वप्नं अर्धवट राहुन गेले.
घरकुल मंजूर झालेले नागरिक गोर गरीब कुटुंबातील असल्याने ते भाड्याच्या घरात राहू शकत नाही.म्हणुन शासन प्रशासनाने ताबडतोब नागरिकांना घराचे बांधकाम करण्यासाठी रेती उपलब्ध करून द्यावी.

