शारदा भुयार
महिला जिल्हा प्रतिनिधी
वाशीम
कारंजा (लाड) नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका आणि मार्च एन्डिगमुळे निराधाराचे अनुदान रखडल्यामुळे अनुदानावर अवलंबून असलेल्या,वयोवृद्ध, अनाथ,निराधार,विधवा,दुर्धर आजारग्रस्तावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळल्याने त्यांच्यामध्ये शासना विषयी कमालीचा आक्रोश व्यक्त होत आहे. नुकत्याच झालेल्या निवडणूकामुळे फेब्रुवारी, मार्च,एप्रिल,मे,जून अशा चार महिन्यांपासून निराधाराचे अनुदान रखडले आहे. या संदर्भात अधिक वृत्त असे की,शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून स्व. संजय गांधी निराधार योजना विभागामार्फत, तहसिल कार्यालयामार्फत समाजातील वयोवृद्ध ज्येष्ठ मंडळींना श्रावण बाळ योजना, विधवा,घटस्फोटित,परित्यक्त्या महिलांना इंदिरा गांधी निराधार महिला योजना, स्व . संजय गांधी निराधार विधवा महिला योजना आणि दिव्यांग,कुष्ठरोगी व इतर दुर्धर आजार ग्रस्त व्यक्तिंना स्व. संजय गांधी योजनेमधून,दरमहा अनुदान वितरीत करण्यात येत असते.निराधार व्यक्तिची उदरनिर्वाहा करीता गुजरानच या अनुदानावर होत असल्याने, निराधार व्यक्ती ह्या अनुदानाची मोठ्या आशेने प्रतिक्षा करीत असतात.वयोवृद्ध निराधार व्यक्ती ह्या अनुदानाला त्यांना मिळणार पगार संबोधतात.ज्या दिवशी त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात.त्या दिवशी निराधारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलून त्यांचा आनंद ओसंडून वहात असतो.परंतु गेल्या चार महिन्या पासून तसेच सार्वत्रिक निवडणूका व मार्चएन्डिगमुळे, निराधाराना शासनाकडून अनुदानाचे वाटपच न झाल्याने निराधार व्यक्ती अनुदानाची अपेक्षा करीत आहेत.तरी कारंजा तहसिल कार्यालयाचे तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष्य घालून,गेल्या चार महिन्याच्या अनुदानाचे वाटप करून निराधारांना दिलासा देण्याची मागणी केशवराव राऊत, शालिग्राम देशमुख,श्रीधर देशमुख,अशोक गोरडे, प्रल्हादराव अनासाने,हसन पटेल,अकलीमाबी अजिजशहा, जाकरीबी, इम्तियाज बानो इ.कडून होत आहे.असे वृत्त निराधारांच्या तक्रारीवरून जनसेवक संजय कडोळे यांनी कळवीले आहे.

