सुविद्या बांबोडे
जिल्हा संपादक
चंद्रपूर
क्राईस्ट हॉस्पिटल येथे सुरु करण्यात आलेल्या डायलिसीस विभागाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विविध शासकिय योजने अंतर्गत आता या रुग्णालयात डायलिसीस ची सेवा उपलब्ध होणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
यावेळी डायोसिस आॅफ चांदा चे डायरेक्टर हेल्थ अपोस्टोलेट तथा वि जी. मा.फा. बेन्नी मुलौक्कल, भावना एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर चंद्रपूरचे मॅनेजींग डायरेक्टर, जॉर्ज कुट्टी लुकोस, केरला समाजमचे अध्यक्ष शाजी जॉन, काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय नळे, क्राईस्ट हॉस्पिटलचे व्यवस्थापक मा. फा. फिलीप सी. एम. आय, मा. फा. जैसन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
विविध शासकिय योजनांच्या माध्यमातून क्राईस्ट हॉस्पिटल मध्ये रुग्ण सेवा केल्या जात आहे. दरम्यान आज पासून सदर रुग्णालयात डायलिसीस सेवा सुरु करण्यात आली असून या डायलिसीस विभागाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आज उपचारा करिता नागपूर कडे जाणा-या रुग्णांच्या संख्येने लक्षणिय घट झाली आहे. याचे श्रेय चंद्रपूरातील शासकिय आणि खाजगी रुग्णालयांना जाते. आता प्रत्येक आजाराचे चंद्रपूर येथेच निदान झाले पाहिजे यासाठी येथील डॉक्टर प्रयत्न करत आहे.
क्राईस्ट हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णांवर आपण शासकिय योजनांच्या माध्यमातून उपचार करुन दिला आहे. आज डायलिसीस मशीन येथे उपलब्ध झाल्याने येथील सुविधेत भर पडला असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यावेळी म्हणाले. यावेळी रुग्णालयाची कर्मचा-यांची उपस्थिती होती.

